ट्रॅक्टरच्या धडकेत एकजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:24 AM2021-05-16T04:24:08+5:302021-05-16T04:24:08+5:30

यवलूज : बिलवर टेकडी पडळ (ता. पन्हाळा ) येथील शेताकडे जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने म्हाळुंगे ...

One killed in tractor crash | ट्रॅक्टरच्या धडकेत एकजण ठार

ट्रॅक्टरच्या धडकेत एकजण ठार

Next

यवलूज : बिलवर टेकडी पडळ (ता. पन्हाळा ) येथील शेताकडे जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने म्हाळुंगे तर्फ बोरगाव येथील बापुसो भाऊ वरपे (वय ७०) यांचा मृत्यू झाला, तर अजित संगाप्पा मुजुमदार हे किरकोळ जखमी झाले. पन्हाळा पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मृत बापुसो वरपे यांची जमीन येथील बिलवर टेकडीशेजारी आहे. गावातील पोलीस कर्मचारी अजित मुजुमदार यांच्या मोटारसायकलवरून ते बिलवर टेकडीशेजारी असलेल्या धोक्याच्या वळणावर आपल्या शेताकडे जाण्यासाठी उतरत असतानाच पाठीमागून आलेल्या खडीने भरलेल्या ट्रॅक्टर एमएच ०९ एफक्यू २६२८ वरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टरची धडक बसून बापुसो वरपे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, तर मोटारसायकल चालक पोलीस कर्मचारी अजित मुजुमदार यांना किरकोळ इजा झाली. याबाबत या घटनेची नोंद पन्हाळा पोलीस ठाण्यात झाली असून, घटनास्थळावर जाऊन घटनेचा पंचनामा करण्यात आला.

फोटो ओळ-१५ बापुसो वरपे.

फोटो ओळ - पडळ (ता. पन्हाळा) येथील बिलवर टेकडीवर ट्रॅक्टरचालकाचा ताबा सुटून ट्रॅक्टर रस्त्याकडेच्या शेतीत जाऊन घुसला होता.

Web Title: One killed in tractor crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.