Kolhapur: अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 18:44 IST2024-02-22T18:43:02+5:302024-02-22T18:44:30+5:30
राधानगरी : अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकजण जागीच ठार झाला. तर एक गंभीर जखमी झाला. बंडोपंत आनंदराव पाटील ...

Kolhapur: अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी
राधानगरी : अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकजण जागीच ठार झाला. तर एक गंभीर जखमी झाला. बंडोपंत आनंदराव पाटील असे मृताचे नाव आहे. तर विश्वास आनंदराव पाटील (रा. घोटवडे ता. राधानगरी) हे जखमी झाले. राधानगरी-फोंडा मार्गावर आज, गुरुवार (दि. २२) दुपारच्या सुमारासह हा अपघात झाला.
अधिक माहिती अशी की, घोटवडे येथील बंडोपंत अन् विश्वास पाटील हे दोघे भाऊ तहसील कार्यालयात कामानिमित्त आले होते. काम उरकून गावी जात असताना कार्यालयापासून काही अंतरावर अज्ञात टेम्पोने त्याच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. यामध्ये बंडोपंत पाटील जागीच ठार झाले. त्यानंतर टेम्पो चालक टेम्पोसह पसार झाला. टेम्पोच्या शोधासाठी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज राधानगरी पोलिस तपासत आहेत.
जखमीवर राधानगरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह घाटगे, अरविंद पाटील हे करीत आहेत.