पन्हाळा गडावरील सोमेश्वर तलावात बुडून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 18:23 IST2022-04-21T18:22:58+5:302022-04-21T18:23:38+5:30

मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला असता मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी तलावावर मोठी गर्दी केली होती.

One drowned in Someshwar lake at Panhala fort | पन्हाळा गडावरील सोमेश्वर तलावात बुडून एकाचा मृत्यू

पन्हाळा गडावरील सोमेश्वर तलावात बुडून एकाचा मृत्यू

पन्हाळा : हात पाय धुण्यासाठी सोमेश्वर तलावात उतरले असता तोल जाऊन पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाला. शामराव हरी मोरे (वय-५५, रा. नेबापूर, ता. पन्हाळा) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला असता मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी तलावावर मोठी गर्दी केली होती.

याबाबत माहिती अशी की, येथील सोमेश्वर तलावात आज दुपारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. हा मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी तलावावर गर्दी केली होती. हा मृतदेह साताप्पा हजारे यांनी पाण्यातून बाहेर काढला व पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात दिला.   

पन्हाळा पोलिसांनी या व्यक्तीची ओळख पटवली असता ते शामराव हरी मोरे असल्याचे स्पष्ट झाले. मोरे हे पन्हाळा येथे एका खासगी बंगल्यात वॉचमन म्हणून काम करत होते. दुपारच्या सुमारास तलावात ते हात पाय तोंड धुण्यासाठी उतरले असता तोल जाऊन ते पाण्यात बुडाले. सदर मृतदेह पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला. अधिक तपास पन्हाळा पोलीस निरीक्षक अरविंद काळे, धरमेश ठाणेकर, बाजीराव चौगले,विलास जादुवर, मारूती पाटील आदी करीत आहेत.

Web Title: One drowned in Someshwar lake at Panhala fort