बाभळीच्या सुटकेसाठी धावली रुग्णवाहिका, प्लास्टिकच्या पिशव्यांनी कोंडलेल्या झाडाने घेतला मोकळा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 18:43 IST2025-06-07T18:43:30+5:302025-06-07T18:43:49+5:30

दिनकर चौगले यांची धडपड

On the occasion of World Environment Day nature lover Dinkar Chougule removed plastic bags stuck to the acacia tree in the vicinity of the primary health center in Hatkanangale kolhapur | बाभळीच्या सुटकेसाठी धावली रुग्णवाहिका, प्लास्टिकच्या पिशव्यांनी कोंडलेल्या झाडाने घेतला मोकळा श्वास

बाभळीच्या सुटकेसाठी धावली रुग्णवाहिका, प्लास्टिकच्या पिशव्यांनी कोंडलेल्या झाडाने घेतला मोकळा श्वास

सरदार चौगुले

पोर्ले तर्फ ठाणे : हातकणंगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील बाभळीचा झाडाला प्लास्टिकच्या पिशव्यांनी अक्षरक्ष: कोंडले होते. मानवी आयुष्याला बसलेला प्लास्टिकच्या वेढ्याचे हे झाड म्हणजे प्रतिकच ठरावे. परंतु, संवेदनशील निसर्गमित्र दिनकर चौगुले यांनी ही झाडाची अवस्था पाहिली आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या झाडाचा श्वास मोकळा केला.

घडले ते असे : दिनकर चौगुले हे मुंबईहून रेल्वेने गेल्या पंधरवड्यात कोल्हापूरला येत होते. प्रवासादरम्यान माळावर प्लास्टिकने वेढलेले हे बाभळीचे झाड त्यांनी पाहिले. या झाडाचे खोड हिरवे होते तर विस्तार प्लास्टिकच्या विळख्याने वाळत चालला होता. थाेडक्यात त्या झाडाची नाशाकडे वाटचाल सुरू होती. ते पाहून ते मनोमन अस्वस्थ झाले. माणसाच्या तोंडाला महिनाभर प्लास्टिकची पिशवी बांधून ठेवली तर कसे होईल, असा विचार त्यांच्या मनांत आला आणि या झाडाला मोकळे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

कोल्हापुरातील गंगावेश येथील नाना प्रेमी विचारमंचचे अमर जाधव यांना ही बाब त्यांनी सांगितली. या सर्वांनी निर्णय घेतला आणि ज्या पद्धतीने रुग्णवाहिकेतून रुग्णाला वाचवण्यासाठी नेले जाते. तसे हे सर्वजण रुग्णवाहिकेतून हातकणंगले येथे गेले. काटेरी बाभळीच्या झाडावरील तीन पोती प्लास्टिक कचरा अतिशय परिश्रमपूर्वक काढण्यात आला आणि हे झाड मोकळे केले. प्रा. अनिल पुणवतकर, जितेंद्र चव्हाण, आदित्य देवकुळे यांचेही त्यांना याकामी सहकार्य मिळाले.

प्लास्टिक प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. प्लास्टिकचा वापर वाढल्यामुळे पर्यावरणावर तर गंभीर परिणाम होत आहे. शिवाय मानवाला सुध्दा त्याचे परिणाम भोगावे लागणार आहे. प्लास्टिकच्या विळख्यात सापडलेल्या बाभळीच्या झाडाचा श्वास गुदमरल्यामुळे ते वाळत चालले होते. मानवाला हा इशारा असून यातून बोध घेण्याची गरज आहे. - दिनकर चौगुले निसर्गमित्र पोर्ले तर्फ ठाणे

Web Title: On the occasion of World Environment Day nature lover Dinkar Chougule removed plastic bags stuck to the acacia tree in the vicinity of the primary health center in Hatkanangale kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.