गुलाल-खोबऱ्याची उधळण, चांगभलचा गजर; जोतिबावरील पहिला पालखी सोहळा संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 12:43 IST2023-10-23T12:43:18+5:302023-10-23T12:43:40+5:30
खंडेनवमीच्या मुहुर्तावर श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर पालखी सोहळा सुरु झाला

गुलाल-खोबऱ्याची उधळण, चांगभलचा गजर; जोतिबावरील पहिला पालखी सोहळा संपन्न
दीपक जाधव
जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर ७ जून (सरता रविवार) नंतर बंद झालेला पालखी सोहळा खंडेनवमीच्या मुहुर्तावर आज पासून सुरु झाला. गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत व चांगभलच्या गजरात सकाळी साडे आठ वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.
तत्पूर्वी पहाटे गावातील सुहासिनी महिलांचा पारंपरिक पद्धतीने दिवे ओवाळणीचा कार्यक्रम पार पडला. या पालखी सोहळ्यात समस्त ग्रामस्थ व पुजारी सहभागी झाले होते. पालखी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनाचा भारत राखीव बटालियनचा वाद्यवृंद व श्री शामराव पाटील शिक्षण समुह तळसंदे याचा विद्यार्थाचे ढोल ताशा पथक पालखी समोर सेवेला होते.
तत्पूर्वी दख्खनचा राजा जोतीबाची नवरात्रउत्सवाच्या नवव्या माळेला श्री कृष्णाच्या रुपात अलंकारिक पुजा बांधण्यात आली होती. ही पुजा समस्त दहा गावकर यांनी बाधली. पालखीची मंदीर प्रदक्षिणा पार पडल्यानंतर तोफेची सलामी होऊन मुख्य मंदीरात आरती सोहळा झाल्यानंतर धुपारती सोहळा मानाच्या उंट घोडा व देवसेवका समवेत यमाई गेला.