शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीला हुल्लडबाजी; पुंगळ्या काढून दुचाकी फिरवल्या, कोल्हापूर पोलिसांनी गाड्या जप्त करुन ४०० हुल्लडबाजांना साडेतीन लाखांचा दंड केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:36 IST

हिडीस स्वरूपाने चांगल्या कार्यक्रमांना गालबोट

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. ४०९ वाहनचालकांकडून साडेतीन लाखांचा दंड वसूल केला. सायलेन्सरच्या पुंगळ्या काढलेल्या ३२ दुचाकी जप्त केल्या.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने मंडळांकडून मिरवणुका काढल्या जातात. शिवज्योत आणली जाते. याशिवाय काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यादरम्यान काही हुल्लडबाजांकडून बेदरकारपणे वाहने चालवून स्वत:सह इतरांच्याही जीवाला धोका निर्माण केला जातो. सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून बेदरकारपणे दुचाकी चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. याला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी (दि. १८) सायंकाळपासून ते गुरुवारी (दि. १९) सकाळी अकरापर्यंत विशेष मोहीम राबवली. हुल्लडबाजी करणाऱ्या ४०९ वाहनधारकांना पकडून साडेतीन लाखांचा दंड केला. मोठ्या आवाजासाठी पुंगळ्या काढलेल्या ३२ दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे दुचाकी देताना वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या सूचना द्यावेत. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा वाहतूक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिला आहे.हिडीस स्वरूपअनेक मंडळे विधायक उपक्रमांनी जयंती साजरी करतात. काही मंडळांचे कार्यकर्ते अतिउत्साहाच्या भरात दुचाकींच्या पुंगळ्या काढून रात्रभर परिसरात फिरवतात. काही ठिकाणी डीजेचा दणदणाट केला जातो. हिडीस स्वरूपाने चांगल्या कार्यक्रमांना गालबोट लावले जाते. यावर मंडळे आणि तरुणांनी गांभीर्याने विचार, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

अशा केल्या कारवायागुन्हा - कारवाया - दंडलायसन्स जवळ नसणे - १०७ - ७१ हजारट्रिपल सीट - ४५ - ४५ हजारम्युझिकल हॉर्न - ४० - २५ हजारमोबाइलसह ड्रायव्हिंग - ३१ - ३१ हजारकर्कश हॉर्न - २२ - २२ हजारविनालायसन्स - ११ - ५५ हजारएकेरी मार्गाचे उल्लंघन - १० - ५ हजारअल्पवयीन मुलांना वाहन देणे - २ - १० हजारइतर - १२० - ७४ हजार ९५०

दुचाकी पेटलीछत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या काही हुल्लडबाज तरुणांनी रात्रभर पन्हाळा रोडवर उच्छाद मांडला. सायलेन्सरला आग लावून दुचाकी पळवणे, स्टंट करणे, आरडाओरडा करणे, कर्कश्श आवाज काढण्याचे प्रकार सुरू होते. यातून केर्ली येथील ग्रामस्थांनी काही हुल्लडबाजांना चोप दिला. वारणानगर येथे स्टंट करताना एका दुचाकीने पेट घेतला. पाचगाव परिसरातही काही ठिकाणी पहाटेपर्यंत सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून दुचाकी पळविण्याचे प्रकार सुरू होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Police Crackdown on Shiv Jayanti Rowdies, Fine ₹3.5 Lakhs

Web Summary : Kolhapur police fined 409 individuals ₹3.5 lakhs for reckless driving during Shiv Jayanti celebrations. 32 bikes with modified silencers were seized. Action was taken against various traffic violations, including noise pollution and underage driving. Police warn of continued enforcement.