कोल्हापूर : ‘लोकमत’च्या २१ व्या वर्धापनदिनी परंपरेप्रमाणे याही वर्षी बुधवारी भर पावसात मान्यवरांसह वाचक, जाहिरातदार, हितचिंतक आणि समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘लोकमत’ आणि कोल्हपूर जिल्ह्यातील वाचकांचे नाते किती घट्ट बांधले गेले आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. ‘लोकमत’चे उपाध्यक्ष मकरंद देशमुख आणि कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.संध्याकाळी सहाच्या सुमारास महासैनिक दरबार हॉलमध्ये प्रारंभी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, डाॅ. डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख संजय डी. पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ, भाजप महिला माेर्चाच्या राज्य उपाध्यक्ष शौमिका महाडिक, महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता, कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. व्ही. आर. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यानंतर संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांना अभिवादन करून ‘लोकमत’च्या ‘ब्रँड कोल्हापुरी’ या विशेषांकाचे प्रकाशन या सर्वांच्या हस्ते करण्यात आले. ‘लोकमत’च्या लंडन येथील दिमाखदार कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारून दिल्लीत दाखल झालेल्या खासदार धनंजय महाडिक यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
यानंतर सुमारे साडेतीन तास कोल्हापूरसह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्ते आणि नागरिकांनी शुभेच्छांसाठी अक्षरश: गर्दी केली. आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, रजनीताई मगदूम, वसंत मुळीक, बाळ पाटणकर, अभयकुमार साळुंखे, कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, कुलसचिव व्ही.एन.शिंदे, प्र-कुलगुरू पी.एस.पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, संजय पवार, सत्यजित कदम, विजयसिंह माने, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण डोंगळे,
किसन कुराडे, डॉ. संतोष प्रभू, डॉ. अभय कोडोलीकर, डॉ. ज. ल. नागांवकर, लीला नागांवकर, साखरतज्ज्ञ विजय औताडे, ‘शाहू’चे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र चव्हाण, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच.आर.जाधव, व्यवस्थापकीय संचालक सुधीर कामेरीकर, उद्योजक आनंद माने, राजू पारीख, शंकर पाटील, अभिजित मगदूम, चेंबर्सचे अध्यक्ष संजय शेटे, आर्किटेक्ट जीवन बोडके, अजय कोराणे, ‘अवनी’च्या अनुराधा भोसले, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे,
मुद्रांक जिल्हाधिकारी बाळासाहेब वाघमोडे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, माहिती उपसंचालक प्रवीण टाके, पोलिस उपअधीक्षक तानाजी सावंत, सुवर्णा पत्की, प्रिया पाटील, कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी आदी मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून ‘लोकमत’ला शुभेच्छा दिल्या.सनई-चौघड्याची मंजुळ सुरावट आणि पावसामुळे निर्माण झालेल्या गारठ्यामध्ये गरम दुधाचा आस्वाद घेत उपस्थितांनी ‘लोकमत’च्या वाटचालीबद्दल अनेक आठवणीही यावेळी सांगितल्या. ‘लोकमत’चा वर्धापनदिनाचा कार्यक्रम म्हणजे सर्व क्षेत्रांतील अनेकांचे गाठीभेटींचे केंद्र ठरले. त्यामुळे अनेकांनी यावेळी एकमेकांशी संवाद साधण्याची संधीही साधली.
पालकमंत्र्यांच्या शुभेच्छापालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दुपारीच ‘लोकमत’ शहर कार्यालयास शुभेच्छा देण्यासाठी भेट दिली. आरोग्य विभागाच्या कामाकाजाविषयी माहिती देतानाच त्यांनी ‘लोकमत’च्या वाटचालीबद्दलही प्रशंसोद्गार काढले. शहर, जिल्ह्याच्या विविध प्रश्नांबाबतही त्यांनी यावेळी चर्चा केली.