शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

तेलाची फोडणी महागली, सरकी तेल ११० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 4:54 PM

सरकी तेलाच्या दरात गेल्या दोन आठवड्यांपासून वाढ सुरू असून, किरकोळ बाजारात ११० रुपये किलोपर्यंत दर पोहोचला आहे. त्यामुळे गृहिणींना तेलाची फोडणी जरा जपूनच टाकावी लागणार आहे. भाजीपाल्याची आवक, दरदाम स्थिर असून कडधान्यांच्या दरांतही फारसा चढउतार दिसत नाही.

ठळक मुद्देतेलाची फोडणी महागली, सरकी तेल ११० रुपये भाजीपाला, कडधान्यांचे दर मात्र स्थिर

कोल्हापूर : सरकी तेलाच्या दरात गेल्या दोन आठवड्यांपासून वाढ सुरू असून, किरकोळ बाजारात ११० रुपये किलोपर्यंत दर पोहोचला आहे. त्यामुळे गृहिणींना तेलाची फोडणी जरा जपूनच टाकावी लागणार आहे. भाजीपाल्याची आवक, दरदाम स्थिर असून कडधान्यांच्या दरांतही फारसा चढउतार दिसत नाही.केंद्र सरकारने तेल आयातकरात वाढ केल्याने गेले महिनाभर तेलाच्या दरात वाढ होत गेली. त्याचबरोबर चीनकडून सूर्यफुलाच्या तेलाची जास्त खरेदी सुरू केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गोड्या तेलाला तेजी आहे. सूर्यफुलाच्या दरात वाढ झाल्याने आपोआपच सरकी तेलावर परिणाम झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात सरकी तेलाचा दर ११० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे गृहिणींचे स्वयंपाकघराचे बजेट काहीसे कोलमडणार आहे.कडधान्य बाजार तुलनेत स्थिर आहे. गेल्या आठवड्यापेक्षा त्यात फारसा चढउतार दिसत नाही. तूरडाळ १०० रुपये, हरभराडाळ ७०, मूग १००, मूगडाळ १२०, मटकी १२० रुपये किलो आहे. शाबू ६५, तर साखर ३८ रुपये किलो आहे. भाजीपाला मार्केटमध्ये आवक चांगली आहे. पावसाने काहीशी उसंत घेतल्याने गेल्या आठवड्यापेक्षा आवक वाढली आहे. त्यामुळे दरात चढउतार दिसत नाही.

टोमॅटोच्या दरांत थोडी वाढ झाली असून किरकोळ बाजारात दर ५० रुपये किलोपर्यंत आहे. दोडका, गवारी, वाल ६० रुपये किलो आहे. वांगी, ढबू, कारली, ओली मिरची ४० रुपये किलोपर्यंत आहे. कोबी, फ्लॉवर, भेंडीचे दर स्थिर आहेत. कांदापात १० व मेथी २० रुपये पेंढी आहे. एकूणच भाजीपाला मार्केटमध्ये गत आठवड्याच्या तुलनेत फारसा फरक दिसत नाही.फळबाजारामध्ये सफरचंद, डाळींब, चिक्कू, सीताफळ, मोसंबी या फळांची रेलचेल पाहावयास मिळते. सफरचंद, चिक्कूंना अधिक मागणी असून किरकोळ बाजारात सफरचंद ८०, तर चिक्कू ५० रुपये किलो आहेत. त्याशिवाय केव्ही, पपई या फळांनाही मागणी आहे.दसऱ्याच्या तोंडावर तेल कडाडलेदसरा-दिवाळीत गोड्या तेलाची मागणी अधिक असते. दसऱ्याच्या तोंडावरच तेलाने शंभरी पार केल्याने ऐन सणासुदीत दर कोठेपर्यंत जातील, याचा अंदाज बांधता येत नाही.

असे आहेत तेलाचे किरकोळ बाजारातील दर, प्रतिकिलो -

  • सरकी - ११० रुपये
  • पामतेल - ११५ रुपये
  • सूर्यफूल - १३० रुपये
  • शेंगतेल - १६० रुपये

चीनने सूर्यफुलाच्या तेलाची खरेदी वाढविल्याचा परिणाम सध्या देशांतर्गत बाजारपेठेत दिसत आहे. खरीप काढणीनंतर हे दर कमी होण्याची शक्यता आहे.- केतन तवटे, तेलाचे व्यापारी, कोल्हापूर

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर