शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

कचरा उठावासाठी पदाधिकारी आक्रमक

By admin | Updated: September 9, 2016 01:12 IST

वाहने नादुरुस्तच्या कारणाने संतप्त : अधिकाऱ्यांच्या दालनात कचरा टाकण्याचा इशारा

कोल्हापूर : गणेशोत्सवासारखा अत्यंत महत्त्वाचा सण सुरू असल्याने शहरातील कचरा दररोज उचलला जावा, अशी अपेक्षा असताना महानगरपालिका प्रशासनाकडून वाहने नादुरुस्त असल्याचे कारण दिले जात असल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, तसेच वर्कशॉप प्रमुख रावसाहेब चव्हाण यांना चांगलेच फैलावर घेतले. येत्या दोन दिवसांत जर शहरातील कचरा उठाव झाला नाही तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कचरा टाकण्याचा इशारा महापौर अश्विनी रामाणे यांनी यावेळी दिला. कचरा उठावाची सर्व वाहने तातडीने दुरुस्त करून घ्यावीत, असे आदेश महापौर रामाणे यांनी प्रशासनाला दिले. गेल्या अनेक दिवसांपासून महानगरपालिकेची कचरा उठाव करणारी सहा ते सात आर. सी. वाहने बंद आहेत. त्यामुळे कचरा उठाव करण्याच्या कामात विस्कळीतपणा येत आहे. प्रभागात जेथे कंटेनर आहेत, त्यामध्ये कचरा साचून दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होत आहे. कचरा उठाव करा म्हणून नगरसेवकांनी सांगितले तरी वाहने उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, महिला व बालकल्याण सभापती वृषाली कदम, कॉँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेवक राहुल माने, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, मधुकर रामाणे, आश्पाक आजरेकर, आदींनी सुभाष स्टोअर येथे जाऊन वर्कशॉपचे प्रमुख रावसाहेब चव्हाण यांच्याकडून माहिती घेतली. त्यावेळी सुटे भाग उपलब्ध नसल्याने पाच आर. सी. वाहने नादुरुस्त असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनाही त्या ठिकाणी बोलावून घेण्यात आले. रावसाहेब चव्हाण यांच्याकडून कामाचाअनुभव चांगला नाही; त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे शारंगधर देशमुख यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सुटे भाग उपलब्ध नसल्याचे अतिशय बालिश उत्तर दिल्यामुळे पदाधिकारी चांगलेच खवळले. त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. जर दोन दिवसांत शहरातील कंटेनरमधून साचलेल्या कचऱ्याचा उठाव झाला नाही तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कचरा टाकण्यात येईल, असा दमच महापौरांनी दिला.