शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी महापालिकेत महापौरपदासाठी पडले ओबीसी आरक्षण, इच्छुकांची भाऊगर्दी; 'ही' नावे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 15:16 IST

आवाडे-हाळवणकर पैकी कोणत्या गटाला संधी?, २० वर्षानंतर पुरूष चेहऱ्याला संधी

इचलकरंजी : येथील महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गाचे पडले आहे. त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, येत्या चार दिवसांत स्पष्ट होणार आहे.प्रथमच महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. महापौरपदासाठी मुंबईत सोडत काढण्यात आली. त्यामध्ये इचलकरंजीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण पडले. नागरिकांचा मागास प्रवर्गाचे खुले आरक्षण असल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये तानाजी पोवार, राजू बोंद्रे, प्रदीप धुत्रे, विठ्ठल चोपडे, सतीश मुळीक, नितेश पोवार, सुशांत कलागते, योगेश पाटील, अभिषेक वाळवेकर, ओमकार सुर्वे, उदय धातुंडे, राजू पुजारी,  आदींचा समावेश आहे.ओबीसी दाखला असलेले मात्र खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवून विजयी झालेल्या नगरसेवकांनाही महापौरपदाची निवडणूक लढविता येणार आहे. त्यामुळे महापौरपदासाठी चुरस असणार आहे. सुरेश हाळवणकर आणि प्रकाश आवाडे हे दोन गट सध्या भाजपमध्ये आहेत. कोणत्या गटाला महापौरपद जाणार, यावर महापौरपदाचा उमेदवार ठरणार आहे. आता तरी आरक्षणाची सोडत झाली आहे. येथून पुढील चार दिवस महापौरपदाची उमेदवारी मिळविण्यासाठी रस्सीखेच असणार आहे. २६ जानेवारीनंतर महापौरपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. अद्याप महापौरपदाची निवडणूक जाहीर झालेली नाही.२० वर्षानंतर पुरूष चेहऱ्याला संधीनगरपालिका असताना मागील २० वर्षे महिला नगराध्यक्षा शहराचा गाडा चालवत होत्या. त्यानंतर आता महानगरपालिकेमध्ये ओबीसी खुला प्रवर्ग पडल्यामुळे २० वर्षानंतर पुरूष चेहऱ्याला शहराचा गाडा हाकण्याची संधी मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Municipal Corporation: OBC Reservation for Mayor Post, Many Aspire

Web Summary : Ichalkaranji Municipal Corporation's mayor post is reserved for OBC. Numerous candidates are vying for the position. The decision, influenced by political groups, is expected soon, potentially after January 26th. This marks a shift, offering a male candidate a chance after 20 years of female leadership.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६MayorमहापौरPrakash Awadeप्रकाश आवाडेSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकर