ओवेसी, प्रकाश आंबेडकर यांचा कोल्हापुरात १२ रोजी महामेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 18:09 IST2019-01-29T18:02:48+5:302019-01-29T18:09:14+5:30
कोल्हापूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता शिवाजी स्टेडियम येथे सत्ता संपादन महामेळाव्याचे आयोजन केले आहे. महामेळाव्याला भारिपचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हे मार्गदर्शन करणार आहेत. महामेळाव्यात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आघाडीचे प्रा. सुकुमार कांबळे यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली.

ओवेसी, प्रकाश आंबेडकर यांचा कोल्हापुरात १२ रोजी महामेळावा
कोल्हापूर : येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता शिवाजी स्टेडियम येथे सत्ता संपादन महामेळाव्याचे आयोजन केले आहे. महामेळाव्याला भारिपचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हे मार्गदर्शन करणार आहेत. महामेळाव्यात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आघाडीचे प्रा. सुकुमार कांबळे यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली.
मेळाव्यासाठी लक्ष्मण माने, इम्तियाज जलील, वारीस पठाण, हरिभाऊ भदे, डॉ. दशरथ मांडे, अशोकराव सोनोने, बळीराम शिरस्कर, प्रा. सुकुमार कांबळे, अस्लम सयद, बबनराव कावडे, दिगंबर सकट, सुनील गोटखिंडे हे उपस्थित राहणार आहेत.
या वंचित बहुजन विकास आघाडीमध्ये सुमारे १५० हून अधिक पक्ष, संघटना यांचा समावेश असल्यामुळे मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशीही माहिती प्रा. कांबळे यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे वंचित बहुजन आघाडीतर्फे १२ जागांची मागणी केली आहे, त्याबाबत बुधवारपर्यंत त्यांनी निर्णय न दिल्यास आम्ही स्वतंत्रपणे ४८ जागांवर निवडणूक लढविणार असल्याचेही प्रा. कांबळे यांनी सांगितले.