पारगावच्या ग्रामीण रुग्णालयात परिचारिका दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:23 IST2021-05-13T04:23:56+5:302021-05-13T04:23:56+5:30

नवे पारगाव : पारगाव (ता. हातकणंगले) येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा झाला. वैद्यकीय अधीक्षक डॉ.एम.जी. जमादार ...

Nurses' Day at Pargaon Rural Hospital | पारगावच्या ग्रामीण रुग्णालयात परिचारिका दिन

पारगावच्या ग्रामीण रुग्णालयात परिचारिका दिन

नवे पारगाव : पारगाव (ता. हातकणंगले) येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा झाला. वैद्यकीय अधीक्षक डॉ.एम.जी. जमादार अध्यक्षस्थानी होते.

वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.एस. लाटवडेकर यांच्या हस्ते पहिल्या परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून परिचारिकांचा सन्मान केला. डॉ.लाटवडेकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संजय गायकवाड, दिनकर पोवार, परिचारिका सरोज शिंदे, मनीषा शिंदे यांची भाषणे झाली. परिचारिकांनी रुग्णसेवेची शपथ घेतली.

औषधनिर्माण अधिकारी आशुतोष चव्हाण, स्नेहल शिंदे, सुनंदा चव्हाण, रूपाली जाधव, उषा समुद्रे, निमा पडवी, तनुनीसा शेख, माधवी हजारे, वैशाली पाटील, विलास शिंदे, आनंदा पाटील उपस्थित होते.

फोटो ओळी : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील ग्रामीण रुग्णालयात जागतिक परिचारिका दिनानिमित्त फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करताना डॉ. बी. एस. लाटवडेकर. दुसऱ्या छायाचित्रात परिचारिका रुग्णसेवेची शपथ घेताना.

Web Title: Nurses' Day at Pargaon Rural Hospital