शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
6
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
7
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
8
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
9
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
10
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
11
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
12
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
13
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
14
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
15
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
16
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
17
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
18
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
19
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
20
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

रोखीच्या व्यवहारामुळेच हातगाड्यांची संख्या वाढतेय

By admin | Updated: December 2, 2014 23:17 IST

इचलकरंजी परिसर : परवाना पद्धत अवलंबल्यास नियंत्रण शक्य

राजाराम पाटील- इचलकरंजी --अल्प भांडवलात चांगला नफा आणि रोखीने व्यवहार होणारा व्यवसाय म्हणून हातगाडीवरून खाद्यपदार्थ विक्रीच्या धंद्याकडे पाहिले जात असल्याने इचलकरंजीत हातगाड्यांची संख्या बोकाळली आहे. नगरपालिकेकडे सुमारे २३०० हातगाडीधारकांनी फेरीवाले पुनर्वसनासाठी अर्ज दाखल केले असून, साडेचार हजार फेरीवाल्यांची संख्या आहे.खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्यांची अन्न व भेसळ प्रतिबंधक किंवा नगरपालिका अथवा पोलिसांकडे कोणतीही नोंद नसल्याने एखाद्या गाडीवर विषबाधेसारखी गंभीर घटना घडल्यास कोणावर कारवाई करावयाची, असा प्रश्न आहे. याबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.शहरात विविध ठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांचे पुनर्वसन आणि ‘हॉकर्स झोन’ व ‘नो हॉकर्स झोन’ निर्माण करण्यासाठी नगरपालिकेत एक समिती स्थापन झाली. पुनर्वसनासाठी फेरीवाल्यांकडून मागविण्यात आलेल्या अर्जामध्ये २२५५ अर्ज हातगाडीधारकांचे असल्याचे सांगण्यात आले. वास्तविक पाहता समितीने अर्ज मागविणे व शहरात फेरीवाल्यांसाठी जागा सूचविणे, इतकेच काम समितीचे आहे. समितीने सूचविलेल्या जागांचे आरक्षण करण्याची शिफारस पालिकेच्या सर्वसाधारण सभेने करावयाची आहे आणि या जागा शासनाच्या नगररचना विभागाकडून आरक्षित केल्या जातील.दरम्यान, वरील प्रक्रियेचा ‘लाभ’ उटवित, दोघा महाभागांनी फेरीवाल्यांबरोबर ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटी केल्या. नगरपालिकेच्या जागेवर पुनर्वसनासाठी जणू काही सर्वाधिकार असल्याचे फेरीवाल्यांना भासविण्यात आले. यामध्ये सोळा लाखांची माया जमविल्याचे सांगण्यात आले. याची चौकशी व्हावी, अशी मागणी होतेय.फेरीवाले - हातगाडीधारकांचे प्रामाणिकपणे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेकडे आलेल्या अर्जांची अन्न व भेसळ प्रतिबंधक खाते, नगररचना विभाग, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने छाननी करावी. ज्यामुळे गरजवंतांनाच हातगाडी चालविण्याचे परवाने मिळतील. ज्या हातगाडीधारकांचे किंवा त्याच्या जवळच्या नातलगांचे हॉटेल-उपहारगृह असल्यास त्यांचे अर्ज अवैध ठरवावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.++चौक रिकामे करण्याची मागणीशहरातील प्रमुख चौकांत असलेल्या आणि रहदारीस अडचण ठरणाऱ्या हातगाड्या व फेरीवाले तातडीने अन्यत्र हलविण्यात यावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. त्याचबरोबर चिकन ६५ विक्रीच्या हातगाड्यांभोवती असलेल्या कुत्र्यांच्या कळपांचा बंदोबस्तसुद्धा नगरपालिकेने युद्धपातळीवर करावा, अशी मागणी महिलावर्गातून होत आहे.पन्नास हजार ते दीड लाख दरशहरातील काही मोक्याच्या जागी हातगाडी चालू करावयाची असल्यास त्याचे दर ठरलेत. सुंदर बागेजवळ एक ते दीड लाख, डेक्कन-शिवाजी पुतळा परिसरात एक लाख, जय सांगली नाका-नदीवेस किंवा एएससी कॉलेज परिसरात पन्नास हजार ते एक लाख असा भाव असल्याची संबंधितांत चर्चा आहे. काही मंदिरांच्या बाहेर नारळ-पूजेचे साहित्य विक्रीच्या जागेससुद्धा पन्नास हजारांचा भाव आहे.