आता ‘स्मार्टफोन’व्दारे तक्रारींचे निवारण

By Admin | Updated: August 30, 2015 00:27 IST2015-08-30T00:27:50+5:302015-08-30T00:27:50+5:30

दोन मोबाईल क्रमांक

Now troubleshooting complaints through 'smartphones' | आता ‘स्मार्टफोन’व्दारे तक्रारींचे निवारण

आता ‘स्मार्टफोन’व्दारे तक्रारींचे निवारण

कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण होण्यासाठी नियंत्रण कक्ष येथे स्मार्टफोन सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ९५५२३२८३८३ किंवा ७२१८०३८५८५ हे दोन मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी पोलीस दलाने नवे पाऊल उचलले असून, या सुविधेचा चोवीस तास लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी केले आहे.
नागरिकांच्या तक्रारींसाठी पोलीस मुख्यालय येथे नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात आला आहे. १०० नंबरवर तक्रार किंवा माहिती दिल्यास तत्काळ त्याची अंमलबजावणी केली जाते. त्याचप्रमाणे स्मार्टफोनची सुविधा पूर्णवेळ सुरू करून देण्यात आली आहे. या स्मार्टफोनवर वॉट्स अ‍ॅप सुविधा सुरू आहे. या सुविधेवर ३० पोलीस ठाण्यांतर्गत नागरिक अवैध धंदे, गुन्हेगारांसंबधी गोपनीय माहिती, फोटो, सीसीटीव्ही फुटेज, आदींबाबत तक्रारी तसेच महिलांसंबंधी माहिती, कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित माहिती वॉट्स अ‍ॅपच्या किंवा एसएमएसच्या माध्यमातून पाठवू शकतात.

Web Title: Now troubleshooting complaints through 'smartphones'