शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

...आता लक्ष जयसिंगपूर ऊस परिषदेकडे

By admin | Updated: October 18, 2015 23:37 IST

‘एफआरपी’बाबत कोण ‘भारी’ ठरणार : शासन कोणती भूमिका घेणार

संदीप बावचे - जयसिंगपूर -यंदाच्या वर्षी एकरकमी ‘एफआरपी’ मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कोल्हापूर येथे साखर सहसंचालक कार्यालयावर विराट मोर्चा काढून ‘स्वाभिमानी’ने रणशिंग फुंकले आहे. तर ६ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेमध्ये खा. राजू शेट्टी आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहेत. गेल्या ऊस परिषदेत सावध भूमिका घेऊन जादा दिवसाचा सरकारला एल्टीमेटम दिला होता. यावर्षी एकरकमी एफआरपीबाबत कोणती भूमिका घेऊन आंदोलनाची दिशा ठरणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.ऊस उत्पादन खर्च व दर याचा ताळमेळ बसत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला साखर कारखानदारांनी एफआरपीची रक्कम तीन टप्प्यांत देण्याच्या भूमिकेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपीचा हाच धागा पकडून एकरकमी एफआरपी हवी यावर जोर धरला आहे. ठिकठिकाणी शेतकरी मेळावे घेऊन जनजागृती केली, सह्यांची मोहीम राबवून १६ आॅक्टोबरला कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयावर विराट मोर्चा काढला. एकरकमी एफआरपीच्या मुद्यावरून ‘स्वाभिमानी’ आक्रमक झाली असून, ‘एफआरपी’प्रश्नी प्रसंगी न्यायालयात जाण्याचाही पवित्रा ‘स्वाभिमानी’ने घेतला आहे.कोल्हापूर येथे काढलेल्या मोर्चात खा. राजू शेट्टी यांनी यावर्षी दुष्काळ असल्यामुळे साखरेचे उत्पादनही कमी होणार आहे. ३ हजाराच्यावर साखरेचे दर होतील, त्यामुळे सरकारला एकरकमी एफआरपी देण्यास अडचण येणार नाही. मात्र, साखर कारखान्यांनी टप्प्याटप्प्याने एफआरपी देण्याचे जाहीर केले आहे. त्यांचा हा डाव मोडून काढून एकरकमी रक्कम घेऊ, असे ‘स्वाभिमानी’ने शासनाला खडसावले आहे.६ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे ऊस परिषदेची घोषणा खा. शेट्टी यांनी केली आहे. ऊस परिषद ऐतिहासिक होण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत शासन कोणती भूमिका घेते याकडे स्वाभिमानीचे लक्ष असून, शासनाने कारखानदारांची बाजू घेतली तर शासनाच्या विरोधात आरपारची लढाई करण्याची तयारीही ‘स्वाभिमानी’ची असल्यामुळे ऊस परिषदेकडे कारखानदार, शासन व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीतएकवेळी खासदार शेट्टींच्या खांद्याला खादा लावून काम करणारे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनीही एकरकमी एफआरपीबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. प्रसंगी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनाही रस्त्यावर उतरणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी खा. शेट्टी व आ. पाटील दोघेही ऊस दराचा प्रश्न उचलून धरत असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीची आशा निर्माण झाली आहे.यशस्वी कोण ठरणारतीन टप्प्यांतील एफआरपीबाबत शासनाने कोणतीही भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. ‘स्वाभिमानी’ने एकरकमी एफआरपीचा मुद्दा उचलून धरला आहे, तर कारखानदारांनी टप्प्याटप्प्याने एफआरपी देण्याची भूमिका घेतली आहे. एफआरपीच्या मुद्यावरून शासन, संघटना की कारखानदार यशस्वी होणार हा देखील कळीचा मुद्दा आहे. पहिली उचल मागे पडलीप्रत्येक वर्षी ऊस परिषदेमध्ये पहिली उचल मागायची आणि आंदोलन अंती तोडगा काढून दर निश्चित केला जात असे. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच पहिल्या उचलीचा मुद्दा मागे पडला असून, एफआरपी एकरकमी द्या, अशी मागणी ‘स्वाभिमानी’ने सुरुवातीपासूनच केल्यामुळे ऊस परिषदेतील एकरकमी एफआरपीचा मुद्दा केंद्रस्थानी ठरणार आहे.