शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अभी तो लढाई बाकी हैं..!

By admin | Updated: July 16, 2015 00:52 IST

अद्याप कोल्हापुरातील एक टक्का, तर राज्यातील किमान पाच ते दहा टक्के व्यापारी एलबीटीच्या कचाट्यात अडकणार आहेत.--कोल्हापूर जिल्हा व्यापारी व उद्योजक महासंघाचे निमंत्रक सदानंद कोरगावकर

राज्य शासनाच्या निर्णयाने ५० कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटीतून (स्थानिक संस्था कर) मुक्ती मिळणार आहे. तरीही अद्याप कोल्हापुरातील एक टक्का, तर राज्यातील किमान पाच ते दहा टक्के व्यापारी एलबीटीच्या कचाट्यात अडकणार आहेत. व्यापाऱ्यांचा कर भरण्यास अजिबात नकार नाही. जितका कर घ्यायचा तितका घ्या; मात्र ती पद्धत एकच व सुटसुटीत असावी, इतकीच व्यापाऱ्यांची मागणी आहे. व्यापाऱ्यांची एलबीटीतून संपूर्ण मुक्ती, फुड अँड सेफ्टी, एफएमसी अ‍ॅक्ट व गुमास्ता अ‍ॅक्ट यातील जाचक अटी रद्द करण्यासाठी व्यापक आंदोलन करावे लागणार आहे. त्यामुळे अभी तो लढाई बाकी हैं..! असे आवाहन कोल्हापूर जिल्हा व्यापारी व उद्योजक महासंघाचे निमंत्रक सदानंद कोरगावकर यांनी ‘लोकमत’शी थेट संवाद साधताना व्यापाऱ्यांना केले.प्रश्न : राज्य शासनाने ‘एलबीटी’बाबत घेतलेल्या निर्णयावर समाधानी आहात काय?उत्तर : राज्य शासनाने ५० कोटींच्या आत वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटीतून मुक्त केले आहे. त्यामुळे ‘थोडी खुशी, थोडा गम’ असाच हा निर्णय आहे. एलबीटीच्या कचाट्यात काही व्यापारी अडकणार आहेत. संपूर्ण एलबीटीतून मुक्तता होण्यासाठी ‘फाम’ या राज्यस्तरीय व्यापारी संघटनेच्या माध्यमातून सरकारशी चर्चा करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा कर भरण्यास किंवा सूट देण्याची मागणी अजिबात नाही. फक्त एकच करप्रणाली करा व ती सुटसुटीत असावी, इतकीच सरकारकडे मागणी आहे. आम्ही करामध्ये सूट मागितली नाही आणि मागणारही नाही.प्रश्न : एलबीटी आंदोलनाचे सिंहावलोकन कसे कराल?उत्तर : राज्यात सर्वांत प्रथम एलबीटीचे आंदोलन कोल्हापुरात सुरू झाले. एलबीटी सुरू झाल्यापासून १ एप्रिल २०११ पासून आठवेळा कोल्हापूर बंद झाले. या दरम्यान तब्बल ४३ दिवस व्यापाऱ्यांनी व्यापार बंद ठेवला. या आंदोलनाचे लोन कोल्हापूरसह सोलापूर, पुणे, सांगली, आदी जिल्ह्यांतून राज्यभर पोहोचले. व्यापाऱ्यांनी एलबीटीच्या लढ्यासाठी वज्रमूठ आवळली. ‘न भूतो न भविष्यती’ अशी एकी दाखविली. या आंदोलनाचे पडसाद राज्यभर पसरले. व्यापाऱ्यांच्या एकीपुढे शासनास नमते घ्यावे लागले. हीच व्यापाऱ्यांची एकी भविष्यात अधिक बळकट झालेली दिसेल, हेच या एलबीटी आंदोलनाचे फलित म्हणावे लागेल.प्रश्न : एलबीटीमुळे पालिकेचे उत्पन्न कमी झाले नाही का?उत्तर : शहरातील व्यापाऱ्यांनी एलबीटी ही अत्यंत किचकट करप्रणाली असूनही महापालिकेला इमाने इतबारे कर भरला आहे. त्यामुळेच सन १२-१३ मध्ये ७८ कोटी रुपये, सन १३-१४ मध्ये ८७ कोटी रुपये, तर सन २०१४-१५ मध्ये ९७ कोटी रुपये इतका कर महापालिकेला जमा झाला. आमचा कर भरण्यास अजिबात विरोध नाही. कर आकारणीच्या पद्धतीला विरोध आहे. व्यापाऱ्यांना कागदामध्ये अडकवून न ठेवता वैभवशाली महाराष्ट्र व भारत बनविण्याच्या कामात सहभागी करून घ्यावे. तसेच एलबीटी रद्द केल्यानंतर १४ हजार कोटींची तूट येणार आहे ना, ती सर्व तुटीची रक्कम व्हॅटमधून घ्या. मात्र, एकदा जीएसटी सुरू झाल्यानंतर पुन्हा दुसरा कोणताही कर अस्तित्वात राहता कामा नये, अशी माफक अपेक्षा व्यापाऱ्यांची आहे. प्रश्न : व्यापाऱ्यांना भविष्यातील वाटचालीबाबत काय आवाहन कराल?उत्तर : राज्य शासन भविष्यात ‘ई-वे’ ही नवीन करप्रणाली आणणार आहे. याचे काम अंतिम टप्प्यात आहे. राज्यात प्रवेश करताना असणाऱ्या सर्व १६ प्रवेशद्वारांवर नाके उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. जी-वन, जी-टू, जी-थ्री ते जी-फाईव्ह अशा प्रकारे विभागणीद्वारे व्यापाऱ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून येणाऱ्या व जाणाऱ्या मालाचा तपशील द्यावा लागणार आहे. १ एप्रिल २०१६ पासून हे अमलात येणार असून, व्यापाऱ्यांना नवीन तंत्रज्ञानासाठी तयार रहावे लागणार आहे. महापालिकेने जाहीर केलेली अभय योजना चांगली आहे. या योजनेमुळे दंड व्याजासह इतर दंडात्मक रकमेत मोठी सूट मिळणार आहे. अधिकाधिक व्यापाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. - संतोष पाटील