पुणे पदवीधरसाठी इच्छुक नाही : शौमिका महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 20:28 IST2020-10-29T20:22:39+5:302020-10-29T20:28:44+5:30
politics, BJP, Pune , Election, kolhapur पुणे पदवीधर मतदार संघातून आपण भाजपकडून इच्छुक नसल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी गुरुवारी सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले. गेली काही दिवस त्यांचे नाव चर्चेत असल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ही निवडणूक लढविण्याचा माझा कधीच मानस नव्हता आणि तो आजही नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

पुणे पदवीधरसाठी इच्छुक नाही : शौमिका महाडिक
कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदार संघातून आपण भाजपकडून इच्छुक नसल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी गुरुवारी सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले. गेली काही दिवस त्यांचे नाव चर्चेत असल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ही निवडणूक लढविण्याचा माझा कधीच मानस नव्हता आणि तो आजही नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असलेल्या नेत्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व करावे असे सगळ्यांनाच वाटते. याआधी आमदार चंद्रकांत पाटील यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केल्यामुळे या निवडणुकीला एक वेगळे महत्त्व आहे. बरेच इच्छुक असताना अचानक माझे चर्चेत आल्याने मलाही धक्काच बसला.
भाजपकडे या मतदारसंघाचे नेतृत्व करू शकतील असे अनेक सक्षम उमेदवार आहेत. पक्ष देईल त्या उमेदवाराच्या विजयासाठी आम्ही सर्वच पदाधिकारी काम करू, असे महाडिक यांनी म्हटले आहे.