मुरगूडात आज ‘नो व्हेईकल डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:44 IST2021-03-04T04:44:45+5:302021-03-04T04:44:45+5:30

महिन्याच्या पहिल्या बुधवारी शहरात नो व्हेईकल डे पाळण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुरगूड नगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाला मुरगूडकर प्रतिसाद देणार ...

'No Vehicle Day' in Murguda today | मुरगूडात आज ‘नो व्हेईकल डे’

मुरगूडात आज ‘नो व्हेईकल डे’

महिन्याच्या पहिल्या बुधवारी शहरात नो व्हेईकल डे पाळण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुरगूड नगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाला मुरगूडकर प्रतिसाद देणार काय ? याचे उत्तर कृतीतून आज दिसणार आहे.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी 'नो व्हेईकल डे ' उपक्रम राबविण्याचा निर्धार मुरगूड नगरपालिकेच्या ११ फेब्रुवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आला. सभेत सर्व नगरसेवकांनी या ठरावाला प्रतिसाद दर्शवला. उपक्रमाचा एक भाग म्हणून मुरगुड नगरपालिकेने शहरांमध्ये महिन्यातून एकदा (प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी ) तरी कोणत्याही इंधन वापराचे वाहन न वापरण्याचे आवाहन केले आहे. यादिवशी शहरात कोणीही नागरिक कोणतेही दुचाकी अथवा चारचाकी इंधन वाहन वापरणार नाही.

Web Title: 'No Vehicle Day' in Murguda today