शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
5
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
6
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
7
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
8
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
9
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
10
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
11
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
12
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
13
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
14
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
15
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
16
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
17
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
18
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
19
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
20
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेकडून सहा महिने आशा सेविकांना मानधन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:21 IST

विनायक शिंपुकडे इचलकरंजी : कोरोना महामारीशी लढताना आशा सेविका यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. घरोघरी जाऊन आशा सेविकांनी सर्वेक्षण ...

विनायक शिंपुकडे

इचलकरंजी : कोरोना महामारीशी लढताना आशा सेविका यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. घरोघरी जाऊन आशा सेविकांनी सर्वेक्षण केले. स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात टाकून लढणाऱ्या या कोरोना योद्ध्यांकडे नगरपालिकेने मात्र दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे. गेल्या सहा महिन्यांपासून नगरपालिकेने आशा सेविकांचे मानधनच दिलेले नाही. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा उद्विग्न सवाल आशा सेविकांना पडला आहे.

कोरोना विषाणूमुळे २३ मार्च २०२० पासून देशासह राज्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. इचलकरंजी शहरातही कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात २८ फेब्रुवारी पासूनच आशा सेविकांनी शहरात सर्वेचे काम सुरू केले होते. सध्या शहर व परिसरात ११५ आशा सेविका आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आशा सेविका ओळखल्या जातात. जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये आशा सेविका मध्यस्थीचे काम करतात. गैर-आदिवासी भागात १५०० लोकसंख्येमागे एक आशा सेविका नियुक्त केलेल्या आहेत. परंतु इचलकरंजी शहरात हे प्रमाण कमी आहे. अपुऱ्या साधनांमध्येही आशा सेविकांनी स्वत:सह कुटुंबाचा जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन संशयित, कोरोनाबाधितांच्या नोंदी घेत आहेत. नोव्हेंबर २०२० पासून ते एप्रिल २०२१ पर्यंतचे मानधन नगरपालिकेकडून अद्यापही मिळालेले नाही. कोरोना सारख्या कठीण काळातही हक्काचे मानधन मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. ही आर्थिक पिळवणूक असल्याचा रोष आशा सेविकांनी व्यक्त केला.

चौकट वस्त्रनगरीची जबाबदारी ११५ आशा सेविकांवर

शहर व परिसराची लोकसंख्या साधारण साडेतीन लाखांच्या आसपास आहे. तसेच हद्दही मोठी आहे. मात्र, एवढ्या मोठ्या लोकसंख्या व हद्द असलेल्या शहराची जबाबदारी केवळ ११५ आशा सेविकांवर आहे. त्यामुळे त्यांना काम करताना अनेक अडचणी येतात.

प्रतिक्रिया

कोणत्याही प्रकारच्या तक्रारी न करता आहे त्या परिस्थितीत आशा सेविका आपले कर्तव्य पार पाडत आहे. त्यांच्या प्रामाणिक कामाचे दाम लवकर मिळावे, हीच अपेक्षा आहे.

नंदिनी करडे, सुपर वायझर

कोरोनासारख्या कठीण काळातही आशा सेविकांनी प्रामाणिक काम केले आहे. तरीही नगरपालिकेने त्यांचे मानधन थकविले आहे. त्वरित त्यांना मानधन न मिळाल्यास काम बंद आंदोलन करण्यात येईल.

सदा मलाबादे, कामगार नेते