गोकुळ, जिल्हा बँकेच्या सत्तेत कोणताही बदल नाही, सतेज पाटलांचा विश्वास; मंडलिकांबाबत म्हणाले..

By भीमगोंड देसाई | Updated: July 22, 2022 15:18 IST2022-07-22T15:13:12+5:302022-07-22T15:18:25+5:30

जिल्ह्यात आम्ही सगळे मिळून एका प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा देत होतो. आता मंडलिक त्याच प्रवृत्तीच्या मांडीला मांडी लावून बसणार का ? हा मोठा प्रश्न

No Change in Gokul, Zilla Bank Powers, MLA Satej Patil Believes | गोकुळ, जिल्हा बँकेच्या सत्तेत कोणताही बदल नाही, सतेज पाटलांचा विश्वास; मंडलिकांबाबत म्हणाले..

गोकुळ, जिल्हा बँकेच्या सत्तेत कोणताही बदल नाही, सतेज पाटलांचा विश्वास; मंडलिकांबाबत म्हणाले..

कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने जिल्ह्यातील राजकारणात बदल होणार असल्याच्या चर्चेना उधाण आले होते. याबाबत माजी गृहराज्यमंत्री, आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले.  

खासदार मंडलिक यांनी शिंदे गटात जाण्यापूर्वी माझ्याशी चर्चा केली. त्यांना मी सर्व राजकीय परिस्थितीची माहिती दिली, तरीही ते शिंदे गटात गेले; पण जाताना त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात तुमच्यासोबत राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे. गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांत विशिष्ट प्रवृत्तीविरोधात आम्ही एकत्र लढलो. त्यामुळे तेथील सत्तेमध्ये काहीही बदल होणार नाही, आम्ही एकसंधच राहू, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

आमदार पाटील म्हणाले, जिल्ह्यात आम्ही सगळे मिळून एका प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा देत होतो. आता मंडलिक त्याच प्रवृत्तीच्या मांडीला मांडी लावून बसणार का ? हा मोठा प्रश्न आहे. देशात सध्या भाजपकडून सूडबुद्धीचे राजकारण केले जात आहे. सर्व विरोधकांना संपवण्याचे काम सध्या सुरू आहे.

Web Title: No Change in Gokul, Zilla Bank Powers, MLA Satej Patil Believes