शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे उद्यान ‘ओपन बार’च

By admin | Updated: December 19, 2014 00:11 IST

पद्माराजे उद्यान : महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांत संताप, फिरायला येणाऱ्या महिलांकडून उद्यानाची स्वच्छता--लोकमत हेल्पलाईन

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या बागा म्हणजे नागरिकांना स्वच्छ हवेत फिरण्याच्या ठिकाणाऐवजी मद्यपींसाठीची एक उत्तम सोय झाली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, पहारेकऱ्यांची मद्यपींवरील मर्जी यामुळे बागांना आता ‘ओपन बार’ची अवकळा प्राप्त झालीय. शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानात रात्रीच्या पार्ट्यांना एवढा जोर चढला आहे की, सांगायची सोय राहिली नाही. रात्री घाण करणार, बाटल्या फोडणार मद्यपी आणि बाग स्वच्छ करणार सकाळी फिरायला येणारे नागरिक! अशीच काहीशी बिकट अवस्था या उद्यानाची झाली आहे. शिवाजी पेठेत रंकाळा तलावाला लागूनच हे पद्माराजे उद्यान आहे. अलीकडे या उद्यानाला मद्यपी आणि रस्सा मंडळ करणाऱ्या मंडळींची दृष्ट लागली आहे. त्याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसायला लागलाय.उद्यान विभागाकडे तक्रारी केल्या की, एकाच दिवशी स्वच्छता केली जाते. तक्रार करून थकलेल्या काही महिलांनी ‘लोकमत हेल्पलाईन’कडे तक्रार नोंदविली आणि आपण काही तरी आवाज उठवा, अशी विनंती केली. उद्यानात रात्री पार्टी झाल्यावर काही मद्यपी दारूच्या बाटल्या फोडतात. अन्नपदार्थ तेथेच टाकतात. पत्रावळ्या, प्लास्टिक चे ग्लास टाकतात. त्यामुळे उद्यान एकप्रकारचा कोंडाळा बनलेला असतो. सकाळी १०० ते १२० महिला, पुरुष या उद्यानात मोकळ्या हवेत फिरायला येतात. अ‍ॅक्युपे्रशर ट्रॅकवरून चालण्याचा सराव करतात; पण उद्यानात येताच फिरण्याच्या मार्गावर सर्वत्र घाणीचे, काचांचे सडे पडलेले असतात. अनेक वयोवृद्ध पायात काचा घुसून रक्तबंबाळ झाले आहेत. साफसफाई करायला कोणी कर्मचारी येत नसल्यामुळे फिरायला येणाऱ्या महिला आधी उद्यान साफ करतात, मग फिरण्याचा व्यायाम करतात. एखादा दिवस स्वच्छता केली तर ठीक, पण अशी किती दिवस स्वच्छता करायची, असा प्रश्न फिरायला येणाऱ्या महिलांना पडलेला आहे. (प्रतिनिधी)महिलांच्या मते या उद्यानात जेवणावळीसाठी येणाऱ्या लोकांमध्ये कर्मचारीच सामील झालेले असतात. त्यामुळे ते अशा मंडळींवर अंकुश ठेऊ शकत नाहीत. महापालिकेने आधी या कर्मचाऱ्यांची साफसफाई करावी आणि मग मद्यपींविरोधात कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.