Nitesh Rane : नितेश राणेंना कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमधून पुढील उपचारासाठी सिंधुदुर्गात हलवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 11:27 IST2022-02-10T10:59:54+5:302022-02-10T11:27:59+5:30

Nitesh Rane: आमदार नितेश राणे यांना कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल मधून पुढील उपचारासाठी सिंधुदुर्ग मधील ओरोस इथल्या सरकारी हॉस्पिटल कडे पाठवण्यात आला आहे.

Nitesh Rane was shifted from CPR Hospital, Kolhapur to Sindhudurg for further treatment | Nitesh Rane : नितेश राणेंना कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमधून पुढील उपचारासाठी सिंधुदुर्गात हलवले

छाया - आदित्य वेल्हाळ

कोल्हापूर - आमदार नितेश राणे यांना कोल्हापुरच्या सीपीआर रुग्णालयातून पुढील उपचारासाठी सिंधुदुर्गमध्ये पाठविण्यात आले आहे. सिंधुदुर्गमधील ओरोसच्या रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे.  

आमदार नितेश राणे हे सोमवारपासून सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. यावेळी त्यांच्यावर वैद्यकीय उपचार आणि विविध तपासण्या करण्यात आल्या होत्या.

उपचार घेत असताना त्यांची प्रकृती बिघडली त्यात त्यांना उच्च रक्तदाब आणि उलट्यांचा त्रास ही झाला होता. मात्र आज त्यांना मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये सिंधुदुर्गला सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी फोंडा घाट मार्गे नेण्यात आले आहे.

Web Title: Nitesh Rane was shifted from CPR Hospital, Kolhapur to Sindhudurg for further treatment