शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

नृसिंहवाडीचे प्रलंबित प्रश्न ‘दादा’ सोडविणार?

By admin | Updated: September 3, 2015 23:54 IST

विकासकामांना मंजुरीची गरज : कन्यागत महापर्वकालाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची आज बैठक

संदीप बावचे- शिरोळ  नाशिकच्या कुंभमेळ्याच्या पाठोपाठच श्री क्षेत्र नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे आॅगस्ट २०१६ ला कन्यागत महापर्वकाल उत्सव साजरा होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून खासदार व आमदार यांनी कन्यागतच्या पार्श्वभूमीवर मी विकासकामासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली असली, तरी खुद्द पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कन्यागत महापर्वकालाच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडी येथे आज, शुक्रवारी सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. येत्या वर्षात येथे आवश्यक असलेल्या विकासकामांसाठी भरीव निधी देऊन पालकमंत्री विकास साधणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सर्वांचे पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे लक्ष लागून राहिले आहे.नृसिंहवाडी येथे एका तपानंतर म्हणजे बारा वर्षांनी नाशिक कुंभ मेळ्याच्या धर्तीवर कन्यागत महापर्वकाल उत्सव साजरा केला जातो. येत्या ११ आॅगस्ट २०१६ ला हा उत्सव साजरा होणार आहे. कन्यागतच्या निमित्ताने महाराष्ट्र, कर्नाटकसह अन्य राज्यांतील भाविक येथे हजेरी लावतात. दरम्यान, नृसिंहवाडीतील अनेक विकासकामे होणे आवश्यक असल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली आहे. बहुमजली पार्किंग, स्वागत कमान, मंदिर रस्ता, नदीघाट अष्टशुल्क तीर्थ बांधकाम व सुशोभीकरण, विठ्ठल मंदिर सांस्कृतिक भवन, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, कृष्णा घाटावरील पूल, शौचालये व स्वच्छतागृहे, क्रीडांगण, शासकीय विश्रामगृह, आदी प्रमुख प्रश्न प्रलंबित आहेत. नृसिंहवाडीबरोबर शिरोळ येथील भोजनपात्र मंदिरासही तितकेच अनन्यसाधारण महत्त्व आहे. आमदार उल्हास पाटील यांनी कन्यागत महापर्वकाल उत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आवश्यक असणारी विकासकामांची मागणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यापूर्वीच केली आहे, तर कन्यागतच्या पार्श्वभूमीवर विकासकामांसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही कन्यागत उत्सवाच्या बाबतीत पुढाकार घेतला आहे. आज, शुक्रवारी सकाळी दहा वाजता नृसिंहवाडी येथे सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्र्यांनी बोलाविली आहे. अवघ्या एक वर्षावर येऊन ठेपलेल्या कन्यागत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित असलेल्या विकासकामांना मंजुरी मिळण्याची गरज आहे.प्रलंबित प्रस्तावबहुमजली पार्किंगसाठी शासनदरबारी दहा कोटींचा प्रस्ताव प्रलंबित आहे. नदीघाट सुशोभिकरणातून सेवा सुविधांसाठी शासनाकडे ८० लाखांचा प्रस्ताव आहे. तो मंजूर होण्याची गरज आहे. वाढत्या भाविकांच्या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी चार कोटींची मागणी ग्रामपंचायतीची आहे, तर संभाजीनगरमधील क्रीडांगणासाठी ७५ लाखांचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला आहे. कन्यागत महापर्वकाल उत्सवासाठी खासदार, आमदार यांच्याकडून सहकार्य मिळत आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडूनही सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे. प्रलंबित असलेल्या कामांना निधी मंजूर होऊन काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशीच अपेक्षा आहे.- शशिकांत बड्डपुजारीअध्यक्ष, श्री दत्त देवस्थान, नृसिंहवाडी