शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

‘निनाई’प्रश्नी जिल्हा बँकेकडून फौजदारीची तयारी

By admin | Updated: May 12, 2015 00:41 IST

तारण जमिनीची विक्री : राज्य बँक, दालमिया कंपनीविरोधात तक्रार

सांगली : करुंगली-आरळा (ता. शिराळा) येथील निनाईदेवी सहकारी साखर कारखान्याची जिल्हा बँकेकडे असलेली १४.७० हेक्टर तारण जमीन राज्य बँकेने परस्पर दालमिया ग्रुपला विक्री केल्याप्रकरणी जिल्हा बँकेकडून राज्य बँक व दालमिया शुगर कंपनीविरोधात येथील जिल्हा न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात येणार आहे. त्याबाबतची तयारी बँकेमार्फत सुरू झाली आहे. स्थानिक पोलिसांनीही याबाबत तक्रार देऊनही संबंधितांवर गुन्हा दाखल केला नसल्याने जिल्हा बँकेचे अधिकारी याबाबतची तक्रार ऋण न्याय प्राधिकरणाकडे करणार आहेत.करुंगली-आरळा येथील निनाईदेवी सहकारी साखर कारखान्याला जिल्हा बँकेने २००१ मध्ये ८ कोटी ७० लाखांचे कर्ज दिले होते. सहभाग योजनेतून तीन कोटी रुपये आणि ऊस तोडणीसाठी वाहतूक उचल म्हणून सुमारे चार कोटी रुपये देण्यात आले आहेत. कर्जापोटी जिल्हा बँकेकडे कारखान्याने १४.६५ हेक्टर गायरान जमीन तारण दिली होती. याच कारखान्याला राज्य बँकेनेही सहभाग योजनेतून १४ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. याच कर्जाच्या वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने हा कारखाना परस्पर दालमिया कंपनीला विकला. यामध्ये जिल्हा बँकेकडे तारण असलेल्या जमिनीचाही समावेश होता. जिल्हा बँकेने या प्रकरणी दालमिया कंपनी आणि राज्य सहकारी बँकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करतानाच जिल्हा बँकेने स्थानिक पोलिसांकडे संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत फिर्याद दिली होती. पोलिसांनीही अद्याप या तक्रारीची दखल घेतलेली नाही. त्यामुळे पुन्हा न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्याची तयारी जिल्हा बँकेने केली आहे. जिल्हा बँकेमार्फत ‘निनाईदेवी’कडील कर्जवसुलीची प्रक्रिया सुरू असतानाच राज्य बँकेने विक्रीचा व्यवहार केल्याने बँकेसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्हा बँकेकडे तारण असलेली जमीन परस्पर दालमिया कंपनीच्या ताब्यात देण्याच्या या प्रकाराबाबत आता स्थानिक न्यायालयासह ऋण न्याय प्राधिकरणाकडेही तक्रार करणार असल्याचे जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा ‘निनाईदेवी’च्या कर्जवसुलीचा मुद्दा गाजणार आहे. हा कारखाना राज्य बँकेने दालमिया कंपनीस २४ कोटी रुपयांना विकला आहे. (प्रतिनिधी)सशर्त परवानगीडिसेंबर महिन्यात उच्च न्यायालयाने दालमिया कंपनीला कारखान्याच्या गळीत हंगामासाठी सशर्त परवानगी दिली होती. गळीत हंगामासाठी ताब्यात आलेल्या कारखान्याच्या कोणत्याही जागेवर कर्ज न काढणे, त्यावर बोजा न चढविणे, परस्पर विक्री न करणे, अशा गोष्टींची बंधने घालण्यात आली आहेत.