निगवेच्या बेपत्ता तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:25 IST2021-03-05T04:25:03+5:302021-03-05T04:25:03+5:30

कोल्हापूर : गेले दोन दिवस बेपत्ता असणाऱ्या करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथील तरुणाचा मृतदेह सोनतळी येथील विहिरीत मिळाला. प्रतीक ...

Nigwe's missing youth drowns in well | निगवेच्या बेपत्ता तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

निगवेच्या बेपत्ता तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

कोल्हापूर : गेले दोन दिवस बेपत्ता असणाऱ्या करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथील तरुणाचा मृतदेह सोनतळी येथील विहिरीत मिळाला. प्रतीक प्रकाश पाखरे (वय २४) असे त्याचे नाव आहे. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याच्या अंगावरची हळद सुकण्यापूर्वीच प्रतीकच्या जाण्याने नातेवाईकांतून हळहळ व्यक्त होत होती. या घटनेची नोंद करण्याचे काम करवीर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होते.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रतीक पाखरे हा तरुण महाद्वार रोडवरील एका कापड दुकानात सेल्समनची नोकरी करत होता. दि. १४ फेब्रुवारी रोजी त्याचा विवाह झाला. त्याचदिवशी त्याचा वाढदिवसही होता. सोमवारी (दि. १) सकाळी तो कामावर जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. पण कामावर पोहोचलाच नाही, रात्री उशिरापर्यंत तो घरी न पोहोचल्याने त्याच्या घरच्यांनी त्याची शोधाशोध केली. पण तो सापडला नाही.

गुरुवारी सकाळी सोनतळी मार्गावर एका विहिरीनजीक त्याची दुचाकी सापडली. त्याच विहिरीत त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळून आला. नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठवला. त्याच्या मागे वडील, आई, पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

फोट नं. ०४०३२०२१-कोल-प्रतिक पाखरे (डेथ)

Web Title: Nigwe's missing youth drowns in well