शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गॅस गिझरच्या गळतीमुळे नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू, पोलिस तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:19 IST

शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण होणार स्पष्ट

सदाशिव मोरेआजरा : बुरुडे (ता. आजरा) येथील भावेश्वरी कॉलनीत गॅस गिझरच्या गळतीमुळे गुदमरून सागर सुरेश करमळकर (वय ३२ ) व त्यांची पत्नी सुषमा सागर करमळकर (२६, दोघेही रा. मूळ गाव शिवाजीनगर आजरा) यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर  स्पष्ट होईल अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांनी दिली.सागरचा विवाह २० मे रोजी झाला आहे. काल तो पत्नीसोबत आंबोलीला फिरण्यासाठी गेला होता. तेथून घरी आल्यानंतर तो फोन उचलत नव्हता व नंतर त्याचा फोन बंद झाला. त्याचे मित्र परिवार आज सोमवार सकाळी बुरुडेपैकी भावेश्वरी कॉलनीतील घरी भेटण्यासाठी गेले. घराचे समोरील दरवाजाला किल्ली अडकवलेली व दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. ते आतमध्ये गेले असता गॅसचा वास येत होता. यावेळी दोघेही बाथरूममध्ये पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.याबाबतची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी करमळकर नवदांपत्याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. लग्नानंतर एक महिन्यातच करमळकर नवदांपत्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.