शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर उपसा केंद्रात आता नवीन पंप, किती कोटी खर्च होणार..वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:18 IST

काळम्मावाडी पाईपलाईनला पर्यायी व्यवस्थेसाठी महापालिकेची तयारी

प्रकाश पाटीलकोपार्डे : पाईपलाईनला गळती, वीज यंत्रणा खंडित होणे असे वारंवार येणारे अडथळे येत आहे. काळम्म्मावाडी थेट पाईपलाईनचा पाणीपुरवठा रामभरोसे झाल्याने महापालिकेने भविष्यात थेट पाईपलाईनच्या पाणीपुरवठ्यात मोठा बिघाड झाला तर पर्यायी व्यवस्था म्हणून फेब्रुवारीत बंद केलेल्या शिंगणापूर उपसा केंद्रात नवीन विद्युत पंप व कपॅसिटर बसवण्यास सुरू केले आहे. यासाठी चार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.काळम्मावाडी थेट पाईपमधून शहराला पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर शिंगणापूर येथील उपसा केंद्र बंद केले होते. पण थेट पाईपलाईनमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडाने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. महापालिकेला शहरवासीयांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून शिंगणापूर उपसा केंद्रातील जुने विद्युतपंप बदलून त्या ठिकाणी नवीन ३ विद्युतपंप बसविण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने ५४० एचपीचे ३ विद्युत पंप, मोटर फिडर पॅनल सेटसह ७ एचटी कपॅसिटर कंट्रोलर, सुभाषनगरसाठी १०० एचपी मोटर पंपासह मोटर कंट्रोल पॅनल बसविण्यात येणार आहे.

यामध्ये शिंगणापूर मधील ३ मोटरपंप व मोटर फिडर पॅनलसाठी २ कोटी ९९ लाख, ७ कपॅसिटर पॅनल व एचटी कंट्रोलसाठी ३० लाख, सुभाषनगरमधील विद्युतपंप व कंट्रोल पॅनलसाठी ७० लाख असा ३ कोटी ९९ लाख रुपये खर्च येणार आहे. यातील १ मोटर व कपॅसिटर पॅनल यांसाठी येणारा खर्च महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान निधीतून करण्यात येणार आहे. उर्वरित खर्च महानगरपालिका करणार असल्याने पालिकेच्या तिजोरीवर ताण येणार आहे.पम्पिंग हाऊस येथे पंपांची स्थिती अशीशिंगणापूर पम्पिंग हाऊस येथे एकूण ७ पंप आहेत. आपटेनगरसाठी ५ पंप यामध्ये ३ कार्यरत आहेत, ४था पाण्याच्या पातळीनुसार चालू-बंद केला जातो. १ स्टँडबाय आहे. २ कसबा बावड्यासाठी आहेत. त्यातील १ चालू, १ स्टँडबाय असे मिळून ४३५ एचपीचे ५ पंप, ५४० एचपीचा १ पंप व ७१० एचपीचा १ पंप आहे.

काळम्मावाडी पाईपलाईनला गळतीची समस्या वारंवार उद्भवत असल्याने भविष्यात जर 'थेट'मध्ये मोठा बिघाड झाला तर शहरवासीयांची पाण्यासाठी हेळसांड होऊ नये यासाठी पूर्वतयारी म्हणून शिंगणापूर उपसा केंद्रात तयारी करत आहोत.  -हर्षजित घाटगे, जलअभियंता, कोल्हापूर महानगरपालिका

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी