शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

एक तास २५ मिनिटांत पोहचणार हैदराबादमध्ये, कोल्हापूर विमानतळावरुन २७ ऑक्टोबरपासून सुरु होणार सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:37 IST

२५ शहरांना कनेक्टिव्हिटी

गोकुळ शिरगाव: कोल्हापूरच्या हवाई वाहतूक क्षेत्रात मोठी भर पडणार असून, इंडिगो एअरलाइनतर्फे कोल्हापूर ते हैदराबाददरम्यान नवीन थेट विमानसेवा सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही सेवा येत्या २७ ऑक्टोबरपासून हिवाळी सत्रात कार्यान्वित होणार आहे. यामुळे कोल्हापूरकरांची देशातील अनेक महत्वाच्या शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.नवीन फ्लाइटचे वेळापत्रक निश्चित झाले असून ६E ७३४४ फ्लाइट कोल्हापूरहून हैदराबादसाठी आठवड्यातून चार दिवस -सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार सकाळी ८:४५ वाजता उड्डाण करेल. या प्रवासासाठी साधारण १ तास २५ मिनिटांचा फ्लाइंग टाइम असेल. या सेवेमुळे कोल्हापूरकरांना हैदराबादमार्गे देशातील २५ हून अधिक शहरांना पोहोचण्याची संधी मिळणार आहे.त्यामध्ये म्हैसूर, वडोदरा, गोरखपूर, कडप्पा, विशाखपट्टणम, कलकत्ता (कोलकाता), लखनऊ, दिब्रुगड, दिल्ली, वाराणसी, भुवनेश्वर, जगदलपूर आणि मुंबई यांसारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे. जिथे दुपारपर्यंत पोहोचता येईल. तसेच अहमदाबाद, श्रीनगर, कोची, इंदौर, कोईम्बतूर यांसारख्या शहरांसाठी दुपार ते संध्याकाळपर्यंत कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल.याशिवाय दोहा येथे जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय फ्लाइटचे कनेक्शन देखील उपलब्ध राहणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नियमित उड्डाणांसाठी सर्वतोपरी योजना व सेवा देण्याचे आश्वासन दिले आहे. विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी सांगितले की, इंडिगोच्या हैदराबाद व बंगळूर येथून चालू असलेल्या फेऱ्यांच्या वेळेत ५ ते १० मिनिटांचा किरकोळ बदल करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur to Hyderabad Flight in 1 Hour 25 Minutes Starting Oct 27

Web Summary : Kolhapur airport will launch a direct Indigo flight to Hyderabad from October 27. The flight will operate four days a week, offering connectivity to over 25 Indian cities and international destinations like Doha via Hyderabad. Travel time is 1 hour 25 minutes.