शेजाऱ्याला क्रिकेटच्या बॅटने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST2021-05-24T04:22:13+5:302021-05-24T04:22:13+5:30

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरुन शेजाऱ्यांच्यात वादावादी होऊन तरुणास शिवीगाळ करुन क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. अभिजीत ...

Neighbor beaten with a cricket bat | शेजाऱ्याला क्रिकेटच्या बॅटने मारहाण

शेजाऱ्याला क्रिकेटच्या बॅटने मारहाण

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरुन शेजाऱ्यांच्यात वादावादी होऊन तरुणास शिवीगाळ करुन क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. अभिजीत प्रकाश खोत (वय ३१ रा. महाडीक कॉलनी, ई वॉर्ड) असे जखमीचे नाव आहे. ही घटना मार्केट यार्ड परिसरातील महाडीक कॉलनीत घडली. याबाबत पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजूभाई बाबूभाई थोरी हे क्रिकेट बॅटला पॉलिश करण्याचे काम करतात. त्यांच्याच इमारतीत शेजारी अभिजीत प्रकाश खोत हे राहतात. नेहमीप्रमाणे थोरी हे बॅटला पॉलिश करण्याचे काम करत होते. त्यावेळी तेथे अभिजीत खोत येऊन त्यांनी राजूभाई थोरी यांना आमच्या घरापासून दूर पॉलिशचे काम करा, आम्हाला धुळीचा त्रास होतो असे सांगितले. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. राजूभाई थोरी, बच्चूभाई बाबूभाई थोरी, प्रकाश राजूभाई थोरी (तिघेही रा. मुक्त सैनिक वसाहत उद्यानसमोर, महाडीक कॉलनी) या तिघांनी अभिजीत यांना क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. त्यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Neighbor beaten with a cricket bat