दुग्धव्यवसाय विकासासाठी बल्क कुलर काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST2021-06-16T04:33:23+5:302021-06-16T04:33:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : काेरोनामुळे जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना ‘गोकूळ’ने कोल्हापूर जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला बळकटी देत दूध उत्पादक ...

The need for bulk cooler time for dairy development | दुग्धव्यवसाय विकासासाठी बल्क कुलर काळाची गरज

दुग्धव्यवसाय विकासासाठी बल्क कुलर काळाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : काेरोनामुळे जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना ‘गोकूळ’ने कोल्हापूर जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला बळकटी देत दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार दिल्याचे गौरवोद्गार आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले. दुग्धव्यवसाय विकासासाठी बल्क कुलर ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

कवठेसार (ता. शिरोळ) येथील आनंद एम. सहकारी दूध संस्थेच्या बल्क मिल्क कुलर युनिटचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील होते.

‘गोकूळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, दुधाची गुणवत्ता वाढीसाठी बल्क कुलर गरजेचे असून, जिल्ह्यातील दूध संस्थांनी बल्क बसवण्यासाठी पुढाकार घेतल्यास ग्राहकांना उत्तम दर्जाचे दूध मिळण्यास मदत होणार आहे. दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे. संघाचे संचालक अजित नरके, सुजित मिणचेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर यांनी प्रास्ताविक केले.

संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, किसन चौगले, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, अंजना रेडेकर, संघाचे अधिकारी, दूध संस्‍थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळी : कवठेसार (ता. शिरोळ) येथील आनंद एम. सहकारी दूध संस्थेच्या बल्क मिल्क कुलर युनिटचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री राजेंद पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी अध्यक्ष विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, डी. व्ही. घाणेकर उपस्थित होते. (फोटो-१४०६२०२१-कोल-गोकुळ)

Web Title: The need for bulk cooler time for dairy development