शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादी’च्या सुंदराबाई बिलावर विरोधकांच्या ‘छावणीत’?

By admin | Updated: July 6, 2015 00:52 IST

गडहिंग्लज पालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीचे नऊ, तर विरोधी जनता दल-जनसुराज्य आघाडीचे आठ नगरसेवक आहेत. ठरवून दिलेली मुदत संपल्याने मावळत्या नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी राजीनामा दिला.

गडहिंग्लज : नगराध्यक्ष पदाची पहिली संधी आपल्यालाच मिळावी या मागणीवर अरुणा शिंदे व सरिता गुरव या दोन्हीही माघारीच्या दिवसापर्यंत ठाम राहिल्यामुळे ‘राष्ट्रवादी’त निर्माण झालेला तिढा ‘गुरव’ यांच्या माघारीने सुटला. मात्र, त्यानंतर सुंदराबाई बिलावर या विरोधी आघाडीच्या छावणीत सामील झाल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास काठावरील बहुमताची राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात येऊन सत्तांतराची शक्यता आहे. त्यामुळे गडहिंग्लजसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.गडहिंग्लज पालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीचे नऊ, तर विरोधी जनता दल-जनसुराज्य आघाडीचे आठ नगरसेवक आहेत. ठरवून दिलेली मुदत संपल्याने मावळत्या नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी राजीनामा दिला. त्यामुळे नगराध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी सकाळी ११ वा. पालिकेची खास सभा बोलविली आहे. सत्ताधारी व विरोधकांत शह-काटशहाच्या हालचाली सुरू आहेत. दोन्ही आघाडीच्या नगरसेवकांना सहलीवर पाठविण्यात आले आहे.नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीतर्फे अरुणा शिंदे, तर विरोधकांतर्फे जनता दलाचे राजेश बोरगावे रिंगणात आहेत. ‘राष्ट्रवादी’च्या बिलावर विरोधकांमध्ये सामील झाल्या तर सत्ताधारी ‘राष्ट्रवादी’ पालिकेत अल्पमतात येईल. त्यामुळे सत्तांतर होईल. तसे घडल्यास ‘गडहिंग्लज’ची राजकीय समीकरणेच पुन्हा बदलणार आहेत.