कोल्हापूर : सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्यांचा मानकरी ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना १२ पैकी ४ पंचायत समित्यांच्या सभापतिपदांवर विराजमान होण्याची संधी मिळाली. भाजप, शिंदेसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन पंचायत समित्यांमध्ये सभापती झाले असून, शाहूवाडी आणि शिरोळच्या सभापतिपदी अनुक्रमे जनसुराज्य आणि शाहू आघाडीचे सभापती बनले आहेत.जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका ७ फेब्रुवारीला झाल्या आणि ९ फेब्रुवारीला निकाल लागला. त्यानंतर मंगळवारी बाराही तालुक्यांच्या ठिकाणी या सभापती निवडी पार पडल्या. त्यामुळे या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.आजरा, गडहिंग्लज, करवीर आणि चंदगड या चार पंचायत समित्यांची सभापतिपदे राष्ट्रवादीकडे आली आहेत. करवीरच्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे साताप्पा पाटील (कुरूकली) यांची, तर उपसभापतिपदी भाजपच्या दीपाली पाटील (पाचगाव) यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाचा भाजपला सत्तेत येण्याची संधी मिळाली.चंदगडच्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे विलास नाईक आणि उपसभापतिपदी राष्ट्रवादीच्याच संज्योती मळवीकर यांची बिनविरोध निवड झाली. गडहिंग्लजच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या डॉ. प्रतिभा चव्हाण आणि उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे अमर हिडदुगी यांची निवड झाली. आजऱ्याच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या जयश्री गाडे (भादवण) यांची, तर उपसभापतिपदी उद्धवसेनेच्या यशोदा पोवार यांची बिनविरोध निवड झाली.कागल पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या सुवर्णा पाटील यांची, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादीच्या इंद्रजित पाटील यांची निवड झाली. हातकणंगलेच्या सभापतिपदी भाजपच्या अश्विनी बिरंजे (पट्टणकोडोली) आणि उपसभापतिपदी शिंदेसेनेचे रघुनाथ कांबळे (आळते) यांची बिनविरोध निवड झाली.राधानगरीच्या सभापतिपदी काँग्रेसचे आर. वाय. पाटील (सोळांकूर) आणि उपसभापतिपदी काँग्रेसच्याच अश्विनी चंद्रकांत चौगुले यांची बिनविरोध निवड झाली. गगनबावड्याच्या सभापतिपदी काँग्रेसच्या छाया प्रकाश देसाई (असंडोली) यांची, तर उपसभापतिपदी काँग्रेसचेच राजेश भगवान पाटील (सांगशी) यांची निवड झाली.पन्हाळ्याच्या सभापतिपदी शिंदसेनेचे रवींद्र पाटील यांची, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादीच्या भारती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. भुदरगडच्या सभापतिपदी शिंदसेनेचे विक्रमसिंह पाटील आणि उपसभापतिपदी शिंदेसेनेच्याच अरुणा देसाई यांची निवड झाली.शाहूवाडीच्या सभापतिपदी चिठ्ठीवर जनसुराज्यच्या प्रियांका तानाजी भोसले यांची, तर उपसभापतिपदी काँग्रेसचे अमरसिंह खोत यांची निवड झाली. तर शिरोळमध्ये यड्रावकर यांच्या शाहू आघाडीचे मिलिंद कुरणे (अब्दुललाट) आणि शाहू आघाडीच्याच मनीषा कदम (शिरदवाड) यांची उपसभापतिपदी निवड झाली.
Web Summary : In Kolhapur, the Nationalist Congress Party secured chairmanship in four Panchayat Samitis. BJP, Shiv Sena (Shinde), and Congress each won two. Janasurajya and Shahu Aghadi secured one each in Shahuwadi and Shirol respectively after elections held in February.
Web Summary : कोल्हापुर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने चार पंचायत समितियों में अध्यक्ष पद हासिल किया। बीजेपी, शिवसेना (शिंदे) और कांग्रेस ने दो-दो जीते। जनसुराज्य और शाहू अघाड़ी ने फरवरी में हुए चुनावों के बाद शाहूवाड़ी और शिरोल में एक-एक सीट हासिल की।