शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

जरगनगर विद्यालयाची यशोगाथा शासनाच्या नॅशनल पोर्टलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 2:50 PM

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती संचलित जरगनगर येथील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर या शाळेची यशोगाथा शासनाच्या नॅशनल पोर्टलवर झळकणार आहे. महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबादकडून शाळेची विशेष दखल घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देजरगनगर विद्यालयाची यशोगाथा शासनाच्या नॅशनल पोर्टलवरमहाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा) कडून दखल

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती संचलित जरगनगर येथील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर या शाळेची यशोगाथा शासनाच्या नॅशनल पोर्टलवर झळकणार आहे. महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबादकडून शाळेची विशेष दखल घेण्यात आली आहे.जरग विद्यामंदिर, जरगनगर या शाळेने विविध स्पर्धा परीक्षांत नेत्रदीपक यश मिळवून नावलौकिक मिळविलेला आहे. शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत दरवर्षी ३० विद्यार्थी जिल्हा व राज्य गुणवत्ता यादीत आणून, स्वत:च्या ‘जरगनगर पॅटर्न’ची महाराष्ट्रभर ओळख निर्माण केली आहे.अभ्यासाबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिल्यामुळे वक्तृत्व, निबंध, नाट्यस्पर्धा, गायन स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा व राज्य स्तरांवर विद्यार्थी चमकत आहेत. जवाहर नवोदय विद्यालय, सातारा सैनिक स्कूलमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांची निवड होत असून, गतवर्षी पाचव्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान शाळेने मिळविलेला आहे.महाराष्ट्रातील पाचवी, तर कोल्हापूर जिल्ह्यातील ही एकमेव शाळा आहे. या सर्व उपक्रमांची विशेष दखल महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद यांनी घेतली असून, शाळेमधील गुणवत्तापूर्ण कार्याची व्हिडिओ डॉक्युमेंटरी बनविण्यात येत आहे. लवकरच शासनाच्या नॅशनल पोर्टलवर जरगनगर विद्यालयाची यशोगाथा पाहायला मिळणार आहे.‘मिपा’च्या संचालिका डॉ. नेहा बी. बेलसरे यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, अकोला, गोंदिया व औरंगाबाद या जिल्ह्यांतील प्रत्येकी एक शाळा निवडली असून, कोल्हापुरातील महापालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर, जरगनगर या शाळेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेकडून कार्यबल गट सदस्य भगवंत पाटील व टीम यशोगाथा तयार करण्याचे काम करीत आहे.पहिल्या दिवशी प्रवेश हाऊसफुल्लशाळेची पटसंख्या आजघडीला प्री-प्रायमरी युनिट ५५० व इयत्ता पहिली ते आठवी १७६० अशी एकूण २३१० वर पोहोचली आहे. गुढीपाडव्याच्या पहिल्याच दिवशी अ‍ॅडमिशन हाऊसफुल्लची परंपरा कायम आहे. 

 

टॅग्स :SchoolशाळाMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर