शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

नरंदेच्या तरुणास डांबून मारहाण

By admin | Updated: August 28, 2015 00:57 IST

सांगलीतील घटना : व्याजाची रक्कम वसुलीसाठी कृत्य; सहाजणांवर गुन्हा; सावकारास अटक

सांगली : व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्याच्या वादातून नरंदे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील संभाजी शिवाजी चव्हाण (वय २५) या तरुणास डांबून ठेवून मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी सावकारासह सातजणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सावकार समीर बाबासाहेब शेख (३४, रा. खणभाग, सांगली) याला अटक केली आहे. समीर शेख याच्यासह सागर शिंदे, प्रमोद शिंदे, बबन राऊत, कदम सोनार, परवेझ चिखलीकर (सर्व रा. सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. शेख हा परवानाधारक सावकार आहे. व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी त्याने संभाजी चव्हाण याची नियुक्ती केली होती. वसूल झालेली रक्कम तो संशयित शेखच्या बँक खात्यावर जमा करायचा. गेल्यावर्षीपासून त्याने ही रक्कम जमा केली नाही. त्यामुळे शेखने त्याला जाब विचारला होता. यातून त्यांच्यात अनेकदा वादावादी झाली होती. यातून शेख व त्याच्या साथीदारांनी वसूल झालेले पैसे बँक खात्यावर का जमा केले नाहीस?, या कारणावरून सांगलीतील मार्केट यार्ड, तसेच फौजदार गल्ली येथे भाड्याने खोली घेऊन संभाजीला तेथे कोंडून ठेवून मारहाण केली. कोल्हापूर रस्त्यावर हॉटेल ‘साई डिलक्स’मधील एका खोलीतही संशयितांनी त्यास कोंडून ठेवून मारहाण केली होती. संशयितांनी वर्षभरात तीन ते चार वेळा संभाजीला डांबून ठेवून मारहाण केली आहे. सावकाराला अटकसातत्याने हा प्रकार घडू लागल्याने संभाजीने गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून सावकार शेखला अटक केली. अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. पीआय आर. के. वाईकर पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)