शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
3
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
4
सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
5
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
6
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
7
Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!
8
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
9
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
10
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!
11
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
12
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
13
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
14
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
15
'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
16
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
17
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
18
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
19
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
20
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?

संमेलनांतून नवलेखकांना ऊर्जा

By admin | Updated: November 15, 2015 23:50 IST

प्रदीप पाटील : देशिंग येथे तेरावे अग्रणी साहित्य संमेलन

कवठेमहांकाळ / देशिंग : वाङ्मयीन वातावरणाच्या जागृतीसाठी आणि नव्या पिढीतील लेखक, कवींना प्रोत्साहन मिळण्यासाठी साहित्य संमेलनांची गरज आहे. अशा संमेलनांमधूनच नवसाहित्यिकांना ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन प्रा. प्रदीप पाटील यांनी केले.देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथे रविवारी तेराव्या अग्रणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. संमेलनास आमदार सुमनताई पाटील, महांकाली कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे, डॉ. रणधीर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निवृत्त पोलीस निरीक्षक वसंतराव पवार यांना ‘देशिंग भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच विटा येथील रघुराज मेटकरी यांना ‘अग्रणी साहित्य साधना’ पुरस्कार दिला, तर पणुंब्रे (ता. शिराळा) येथील वसंत पाटील यांना ‘उत्कृष्ट काव्यसंग्रह’ पुरस्कार देण्यात आला. प्रा. पाटील म्हणाले, आधीची वाङ्मयीन परंपरा आणि समकालीन वाङ्मयीन परंपरा यांच्यातील साम्य आणि निराळेपणा लक्षात येतो. समकालीन साहित्याच्या वाचनाने वर्तमान जीवनाचे वेगवेगळे स्तर समजतात. यामुळे जीवनविषयक जाणीव प्रगल्भ होते. या भूमिकेतून सहित्य संमेलनाचा विचार केला पाहिजे आणि ती घेतली पाहिजे. आमदार सुमनताई पाटील यांनी, साहित्य संमेलनात अनेक नवकवींना पे्ररणा मिळते, असे मत व्यक्त केले. ‘महांकाली’चे अध्यक्ष विजय सगरे म्हणाले, देशिंंगसारख्या भागात अग्रणी साहित्य संमेलने दरवर्षी घेतली जातात, ही अभिमानाची गोष्ट आहे.कार्यक्रमास बांधकाम समिती सभापती गजानन कोठावळे, देशिंगचे सरपंच आप्पासाहेब कोळेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन दयासागर बन्ने, विठ्ठल पवार, संदीप माने, भरत खराडे, सुरेश सदामते यांच्यासह अग्रणी प्रतिष्ठानने केले होते. (वार्ताहर)कवितेला स्त्री अस्मितेचे धुमारे : रणधीर शिंदेसंमेलनाच्या दुपारच्या सत्रात कविसंमेलनाध्यक्ष प्रा. रणधीर शिंंदे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले. यावेळी प्रा. शिंदे म्हणाले की, समकालीन मराठी कवितेच्या विविधतेमध्ये स्त्रियांचे आवाज आपले अस्तित्व दाखवून देत आहेत. शिक्षणाचा प्रसार, काही प्रमाणात खुला झालेला सामाजिक व्यवहार, यामुळे स्त्रिया आपल्या आत्मजाणिवेचा स्वर मांडत आहेत. त्यामुळे स्त्री अस्मितेचे नवे धुमारे मराठी कवितेला फुटत आहेत. प्रारंभी कवी गो. स. चरणकर, चारूत्तासागर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्याहस्ते झाले. सूत्रसंचालन मनीषा पाटील़ संदीप माने यांनी केले. संमेलनास ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन, गौतमीपुत्र कांबळे, माजी सभापती सुरेखा कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.‘मातीविश्व’ काव्यसंग्रहाचे प्रकाशनसंमेलनामध्ये देशिंग येथील शिक्षिका, कवयित्री मनीषा पाटील यांनी लिहिलेल्या ‘मातीविश्व’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन आमदार सुमनताई पाटील यांच्याहस्ते झाले.