शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

एन. डी. पाटील यांचे श्वेता जुमानी यांना खुले आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:10 IST

अंकशास्त्राने प्रश्न सुटतात, भरभराट होते, नि:संतानांना संतती प्राप्त होते, हे दावे बंद खोलीत न करता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुखांसमोर थेट खुल्या चर्चेला येऊन सिद्ध करा. सिद्ध केले तर २१ लाखांचे बक्षीस घेऊन जा, असे खुले आव्हान प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी श्वेता जुमानी यांना दिले आहे.

ठळक मुद्देएन. डी. पाटील यांचे श्वेता जुमानी यांना खुले आव्हानजिल्हाधिकारी, पोलीसप्रमुखांसमोर सिद्ध करून दाखवा!

कोल्हापूर : अंकशास्त्राने प्रश्न सुटतात, भरभराट होते, नि:संतानांना संतती प्राप्त होते, हे दावे बंद खोलीत न करता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुखांसमोर थेट खुल्या चर्चेला येऊन सिद्ध करा. सिद्ध केले तर २१ लाखांचे बक्षीस घेऊन जा, असे खुले आव्हान प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी श्वेता जुमानी यांना दिले आहे.अंकशास्त्राच्या अभ्यासक श्वेता जुमानी यांच्या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)ने विरोध दर्शवल्यानंतर जुमानी यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी ‘अंनिस’ने रुईकर कॉलनी येथील एन. डी. पाटील यांच्या घरी बैठक घेऊन आपली भूमिका आणि पुढील आंदोलनाची दिशाही स्पष्ट केली.यावेळी एन. डी. पाटील म्हणाले, अंकशास्त्र हे थोतांड आहे, विज्ञानाने सिद्ध केले तरी खुळे लोक त्यावर विश्वास ठेवत आहेत. समाजातील जाणत्या लोकांनी दुर्लक्ष केल्यानेच अशा लोकांचे फावले आहे. लोकांच्या अज्ञान आणि अंधश्रद्धेवर पोसलेल्या या बाजारपेठेमुळे खिसा रिकामा होऊ नये, याच भावनेतून अंनिसने त्यांची भोंदूगिरी उघड करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

कोणताही शास्त्रीय आधार नसताना अशा प्रकारचे दावे करणे हीच मुळी मोठी फसवणूक असल्याने जिल्हाधिकारी, पोलीसप्रमुखांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत, पण प्रशासन काहीच करीत नसल्याने आम्हाला रस्त्यावर उतरून प्रबोधनाची भूमिका घ्यावी लागत आहे.

दावा सिद्ध करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा!आता जिल्हाधिकारी, पोलीसप्रमुखांनी यावर बैठक लावावी, मी स्वत: आणि आमचे ‘अंनिस’चे कार्यकर्ते त्याकरिता येतील. तेथे जुमानीनींही यावे, आपले दावे सप्रमाण सिद्ध करून दाखवावेत, त्यांनी ते सिद्ध केल्यास आम्ही जाहीर केलेले २१ लाखांचे बक्षीस लगेच देऊ, हे आम्ही बाँडपेपरवरही लिहून देण्यास तयार आहोत. पण जर का त्या ते सिद्ध करू शकल्या नाहीत, तर मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असेही एन. डी. पाटील यांनी ठणकावले.यावेळी सुजात म्हेत्रे, प्रकाश भोईटे, सुनील स्वामी, अनिल चव्हाण, विनायक चव्हाण, दिलीप कांबळे, गीता हासूरकर, अनिल शेलार, नियाज अत्तार, स्वाती कृष्णात, बाबूराव कदम, अतुल दिघे हे प्रमुख उपस्थित होते.हा तर तानाजी मालुसरे यांचा अपमानच‘तानाजी’ हा चित्रपट महान योद्ध्याच्या देदीप्यमान इतिहासामुळे आणि कलाकारांच्या अभिनय आणि चांगल्या निर्मितीमुळे गाजत आहे. त्यात ‘तानाजी’ ऐवजी एक शब्द वाढवून तो ‘तान्हाजी’ केल्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणावर चालत असल्याचा जुमानी यांनी केलेला युक्तिवाद म्हणजे शिवाजी महाराजांच्या तानाजी मालुसरे या महान योद्ध्याचा अपमान आहे, असे अंनिसचे जिल्हाध्यक्ष संजय बनसोडे यांनी सांगितले.मग जुमानी यांनीच सर्व प्रश्न सोडवावेतअंकशास्त्राप्रमाणे नावात स्पेलिंग बदल केल्यास यश मिळते, कामे होतात, असा दावा जुमानी करत असतील तर सर्वांचेच स्पेलिंग बदलवून शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचेही प्रश्न सोडवून दाखवावेत, नि:संतान असणाऱ्यांना कशी काय संतती प्राप्त होणार हे देखील दाखवून द्या, असे अंनिसच्या कार्यकर्त्या सीमा पाटील व डॉक्टर जयश्री चव्हाण, प्रा. प. रा. आरडे, डॉ. किरण भिंगार्डे यांनी आव्हान दिले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcultureसांस्कृतिक