एन. डी. पाटील यांच्याबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्या अज्ञातांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST2021-05-24T04:22:28+5:302021-05-24T04:22:28+5:30

कोल्हापूर : ज्येष्ठ शेतकरी, कामगार नेते डॉ .एन.डी. पाटील यांच्याबाबत चुकीची माहिती पसरविणाऱ्या अज्ञाताविरूध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा ...

N. D. A case has been registered against unknown persons for spreading false information about Patil | एन. डी. पाटील यांच्याबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्या अज्ञातांवर गुन्हा दाखल

एन. डी. पाटील यांच्याबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्या अज्ञातांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : ज्येष्ठ शेतकरी, कामगार नेते डॉ .एन.डी. पाटील यांच्याबाबत चुकीची माहिती पसरविणाऱ्या अज्ञाताविरूध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सोशल मीडियावरुन डॉ. पाटील यांची बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रम अशोक पाटील (रा. प्लॉट नं.१३, फ्रेंडस कॉलनी, शिवाजी पार्क, कोल्हापूर) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापूरचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची मूळ शरीरयष्टी उत्तम आहे. त्यामुळे ह्या वयातही प्रकृती अगदी ठणठणीत आहे. वयाच्या ९२ व्या वर्षात त्यांनी कोरोनावर मात केली असून असे असताना काही अविचारी प्रवृत्तीने त्यांचे निधन झाले आहे अशा आशयाचे खोटे संदेश व्हॉटसॲप या सोशल मीडियावरुन पसरविले आहेत. कष्टकऱ्यांच्या सोबत अविरत काम करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत अशी बातमी किंवा मेसेज पसरवणे उचित नाही. तरी खोडसाळपणे वृत्त करणाऱ्या अज्ञाताविरूध्द शाहुपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुकीचा संदेश करणाऱ्या अविचारी प्रवृत्तीचा तत्काळ शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शाहुपुरी पोलिसांना दिले आहेत, त्यानुसार पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत. यापुढे, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्याबाबत कोणी चुकीची बातमी पसरवली तर त्यांच्यावरही प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिलेला आहे.

Web Title: N. D. A case has been registered against unknown persons for spreading false information about Patil