शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

मुश्रीफ साहेब, शाहू महाराजांचा वारसा कसा विसरलात?, रोहित पवार यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 14:25 IST

अडचणीच्या काळात साथ नव्हे हात दाखवला

कोल्हापूर : धर्मांध महाशक्तीने यंत्रणांचा वापर करत त्रास देऊनही मंत्री हसन मुश्रीफ याच शक्तीच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने कोल्हापूरकर व शाहू महाराजांचा वैचारिक वारसा विसरलेत या शब्दात आमदार रोहित पवार यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठवली. 

मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जात होते. मात्र, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी सत्ताधारी भाजपबरोबर हातमिळवणी करत मंत्रिमंडळात शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शरद पवार यांच्यामुळे मुश्रीफांना काय- काय मिळाले याचा लेखाजोखाच मांडला. या पोस्टमध्ये आमदार पवार म्हणतात, 'शरद पवार यांच्या मागर्दशनाखाली तुम्ही कोल्हापूरमध्ये सर्वांना सोबत घेऊन सर्वधर्म समभाव जोपासत काम करत होतात.पण, ज्या महाशक्तीने त्यांच्या ताब्यातील यंत्रणांचा गैरवापर करत तुम्हाला प्रचंड त्रास दिला, धार्मिक सलोखा उद्ध्वस्त करून तेढ निर्माण करायची आणि सत्ता मिळवायची हे ज्यांचे धोरण आहे अशा शक्तीच्या मांडीला मांडी लावून तुमच्यासारखी व्यक्ती जाऊन बसते तेव्हा कोल्हापूरकरांचा आणि राजर्षी शाहू महाराजांचा वैचारिक वारसा आपण कसा विसरलात, असा प्रश्न पडतो'.'अजून काय पाहिजे'पक्षाचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा म्हणून शरद पवार यांनी तुमच्याकडे विश्वसाने सूत्रे दिली, मानसन्मान राखला, नेहमीच पदे दिली. आपल्या विजयासाठी जिवाचे रान केले. अडचणीच्या काळात ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आम्हालाही तुमचा अभिमान वाटायचा. पण, अडचणीच्या काळात शरद पवार यांना साथ देण्याऐवजी तुम्ही हात दाखवला, या शब्दांत आमदार पवार यांनी मुश्रीफांच्या भाजपबरोबर जाण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफRohit Pawarरोहित पवार