शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

मुश्रीफांनी खोटी माहिती सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली, ४८ तासात खुलासा करा; समरजित घाटगेंचे आव्हान

By संदीप आडनाईक | Published: February 23, 2023 5:28 PM

शेतकऱ्यांना पुढे करुन मुश्रीफ यांनी येथे अनेक गैरव्यवहार केले

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. परंतु त्यांनी कर्ज घेतले आहे. खोटी माहिती त्यांनी सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे, याचा ४८ तासात खुलासा करा, असे आव्हान भाजपचे जिल्हा अध्यक्ष समरजित घाटगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिले.समरजित घाटगे यांनी पत्रकारांपुढे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ऑडिट रिपोर्टमधील आणि नाबार्डच्या रिपोर्टमधील आकडेवारी पुढे ठेवली. या रिपोर्टनुसार मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्जपुरवठा झाल्याचे सिध्द होते आहे.२०१८-१९ मध्ये१५८.७० कोटी, नाबार्ड रिपोर्टनुसार २०१९-२० मध्ये १९५.३४ कोटी, २०२०-२१ मध्ये २२८.२९ कोटी आणि सरकारी ऑडिट रिपोर्टनुसार २०२१-२२ मध्ये २३२.७९ कोटी कर्ज घेतल्याची आकडेवारी समरजित यांनी दिली. अध्यक्षपदाचा गैरवापर करणाऱ्या मुश्रीफ यांनी बेकायदेशीरपणे हे कर्ज घेतले आहे. याचा ४८ तासात खुलासा करावा आणि त्यांची अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करावी, अशी मागणी समरजित घाटगे यांनी केली आहे.संताजी घोरपडे कारखाना शेतकऱ्यांचा नाहीसरसेनापती संताजी घोरपडे कारखाना हा काही शेतकऱ्यांचा कारखाना नाही, तर त्यात हसन मुश्रीफ यांचेच नातेवाईक आणि मित्र परिवार आहे. ही घरच्या माणसांनाच घेउन स्थापन केलेली कंपनी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पुढे करुन मुश्रीफ यांनी येथे अनेक गैरव्यवहार केले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे यांचे नाव देण्यापेक्षा या कारखान्याला स्वत:ची हसन मुश्रीफ ॲन्ड लिमिटेड कंपनी असे नाव द्यावे, असेही आव्हान त्यांनी दिले. एकत्रितपणे पाठपुरावा ते म्हणाले, मी स्वत: चार्टड अकौंटंट आहे. त्यामुळे जिल्हा बँकेकडून पदाचा गैरवापर करुन त्यांनी केलेला गैरव्यवहार आकडेवारीतून मांडलेला आहे. याचा खुलासा तत्काळ करावा. अजूनही काही मुद्दे टप्प्याटप्याने मांडू असा इशारा समरजित यांनी दिला. हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात किरीट सोमय्या यांनी दीड वर्षापूर्वी तक्रार दिली होती. माझ्याकडेही काही पुरावे आहेत. त्यामुळे आम्ही दोघे एकत्रितपणे पाठपुरावा करत असल्याचे समरजित घाटगे म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफKirit Somaiyaकिरीट सोमय्याSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगे