मुरगुडच्या लक्ष्मी-नारायण संस्थेला १ कोटींवर नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:22 IST2021-04-12T04:22:14+5:302021-04-12T04:22:14+5:30

मुरगूड :- येथील सुवर्णमहोत्सवी श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पत संस्थेला सन २०२०/२१ या अर्थिक वर्षामध्ये एकूण १ कोटी ...

Murgud's Lakshmi-Narayan Sanstha makes a profit of Rs 1 crore | मुरगुडच्या लक्ष्मी-नारायण संस्थेला १ कोटींवर नफा

मुरगुडच्या लक्ष्मी-नारायण संस्थेला १ कोटींवर नफा

मुरगूड :- येथील सुवर्णमहोत्सवी श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पत संस्थेला सन २०२०/२१ या अर्थिक वर्षामध्ये एकूण १ कोटी ६ लाख ७९ हजार ६१६ रुपयांचा निव्वळ विक्रमी नफा झाला, अशी माहिती संस्थेचे सभापती पुंडलिक डाफळे यांनी दिली.

सभापती डाफळे म्हणाले गेल्या अर्थिक वर्षामध्ये वार्षिक उलाढाल ३०५ कोटी ११ लाख झाली असून संस्थेचे खेळते भांडवल ८५ कोटी ४६ लाख इतके आहे. संस्थेकडे ठेवी ५४ कोटी २१ लाख रु.च्या असून त्यावर संस्थेने ४० कोटी ०६ लाखांचे कर्ज वितरण केलेले आहे. गतवर्षीपेक्षा कर्ज वितरणामध्ये रु. ३ कोटी १० लाखांची वाढ झालेली आहे. एकूण कर्जवाटपापैकी २३ कोटी २० लाखांचे सोनेतारण कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेची विविध बँकेमध्ये २३ कोटी ९० लाखांची सुरक्षित गुंतवणूक असून एन.पी.ए शून्य टक्के व थकबाकी ०.०१ टक्के आहे.

संस्थेच्या विक्रमी नफा व बँकिंग व्यवसायाची नोंद घेऊन संचालक मंडळाने कायम सेवकांना एक वेतनवाढ व हंगामी सेवकांना मासिक १ हजार वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी संस्थेचे उपसभापती रवींद्र खराडे ज्येष्ठ संचालक जवाहर शहा, अनंत फर्नांडिस, संचालक दत्तात्रय तांबट, विनय पोतदार,महादेव सणगर, दत्तात्रय कांबळे, चंद्रकांत माळवदे,

किशोर पोतदार, सुजाता सुतार,भारती कामत, जगदीश देशपांडे, कार्यकारी संचालक नवनाथ डवरी, सचिव मारुती सणगर, शाखाधिकारी मनीषा सूर्यवंशी, रामदास शिवुडकर, दत्तात्रय व्हरकट, अनिल सणगर, राजेंद्र भोसले व अंतर्गत तपासणीस श्रीकांत

खोपडे व सर्व सेवक उपस्थित होते.

Web Title: Murgud's Lakshmi-Narayan Sanstha makes a profit of Rs 1 crore