कुरुंदवाडच्या नगरसेवकावर खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:25 IST2021-05-26T04:25:18+5:302021-05-26T04:25:18+5:30

कुरुंदवाड : येथील माजी उप-नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक जवाहर पाटील यांच्यावर एका तरुणाने गुप्ती व रॉडने जीवघेणा हल्ला केला. ...

Murderous attack on Kurundwad corporator | कुरुंदवाडच्या नगरसेवकावर खुनी हल्ला

कुरुंदवाडच्या नगरसेवकावर खुनी हल्ला

कुरुंदवाड : येथील माजी उप-नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक जवाहर पाटील यांच्यावर एका तरुणाने गुप्ती व रॉडने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तीन ते चार जण सहभागी झाले होते; मात्र सुदैवाने ते वार चुकविल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी अकराच्या सुमारास पालिका चौकात ही घटना घडली. हल्लेखोर हल्ला करून पळून गेला.

दरम्यान, नरसेवकावर जीवघेणा हल्ला होऊनही सायंकाळपर्यंत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे शहरात उलट सुलट चर्चेला ऊत आला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक पाटील सकाळी अकराच्या सुमारास दुचाकीवरून नगरपालिकेकडे येत होते. पालिका चौकात येताच हल्लेखोर तरूण आणि नगरसेवक पाटील यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्या वादातून हल्लेखोर तरुणाने रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. पाटील यांनीही मारहाण करत असताना तरुणाने गुप्ती काढून वार केल्याने पाटील यांच्या उजव्या दंडाला लागल्याने रक्तबंबाळ झाले. पालिका चौकातच हाणामारी सुरू झाल्याने नागरिकांत घबराहट निर्माण झाली होती. नागरिकांनी गर्दी केल्याने हल्लेखोर पळून गेले. भरचौकात दिवसाढवळ्या नगरसेवकांवर जीवघेणा हल्ला होऊनही पोलिसांत तक्रार दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

फोटो - २५०५२०२१-जेएवाय-०६-जवाहर पाटील

Web Title: Murderous attack on Kurundwad corporator