शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून, कोल्हापुरातील मौजे वडगावमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 18:40 IST

रक्ताने माखलेला विळा घेऊन स्वतः हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर झाला होता.

शिरोली : अनैतिक संबंधातून  संशयातून पतीने पत्नीचा विळ्याने वार करुन खून केल्याची घटना मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील सुतार पाणंद बारबाहीच्या शेत परिसरात काल, बुधवारी घडली. कविता चंद्रकांत कोरवी (वय-२६) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती चंद्रकांत किसन कोरवी (३५) हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला होता.    मौजे वडगाव येथे शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथील चंद्रकांत किसन कोरवी आणि त्याची पत्नी कविता कोरवी हे कुटुंब शेतमजुरी करतात. ते चार वर्षापासून भाड्याच्या खोलीत राहत आहेत. त्यांना एक १४ वर्षांचा आणि एक बारा वर्षांचा अशी दोन मुले असून मोठा मुलगा हा निमशिरगाव येथे आजीकडे राहतो. तर लहान मुलगा हा आई-वडिलांच्याकडे मौजे वडगाव येथे राहतो.पत्नी कविताचे गावातील एका तरुणा सोबत अनैतिक संबंध होते असा संशय पती चंद्रकांत याला होता. याबाबत दोन वर्षांपूर्वी कवीताला त्या व्यक्तीचे संबंध सोडून दे असे चंद्रकांत याने सांगितले होते. सहा महिन्यांपूर्वी सुद्धा जवळच्या आणि मौजे वडगाव मधील लोकांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केले होते. पती चंद्रकांत याने अनेकदा पत्नीकडे घटस्फोट मागितला होता. पण कविता घटस्फोट द्यायला तयार नव्हती. यातून दोघांमध्ये वाद होत होता.बुधवारी सकाळी सात वाजता कविता शेतमजूरीसाठी अन्य महिलांच्या बरोबर बारबाही नावाच्या परिसरातील चौगुले यांच्या शेतात कामासाठी गेली होती. यावेळी संबंधित तरुण सुद्धा शेतात कामाला होता. हे चंद्रकांतला समजल्यावर दुपारी दीडच्या दरम्यान चंद्रकांत हा चौगुले यांच्या शेतात जाऊन पत्नीला घेऊन घरी येत होता. तुला कामाला जायच नाही असं सांगितलं असताना कामावर का गेलीस यावरुन दोघांच्यात वाद झाला.सुतार पाणंद येथे  ते घरी येत असताना या ठिकाणी विहीरी शेजारी कविता बसली होती. यावेळी चंद्रकांत याने धारधार विळ्याने, कविताच्या गळ्यावर, पोटावर आणि पाठीवर सपासप वार केले. कविता रक्ताच्या थारोळ्यात जाग्यावरच ठार झाली. चंद्रकांत याने आपल्या हातातील सायकल तेथेच टाकून थेट हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर झाला. यानंतर आरोपी चंद्रकांत कोरवीला शिरोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांनी ताब्यात घेतले. या घटनेची नोंद रात्री उशिरा शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.पाण्याचा पाटात रक्ताचे डाग धुतलेपत्नीचा धारधार विळ्याने खून करताना चंद्रकांत रक्ताने भिजला होता. शेजारी सुरू असलेल्या पाण्याच्या पाटात चंद्रकांत कोरवी यांने हे अंगावरील रक्त धुतले. त्यानंतर रक्ताने माखलेला विळा घेऊन स्वतः हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर झाला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस