सोन्याच्या हव्यासापोटी वृद्ध महिलेचा खून, कोल्हापुरातील म्हांळुगे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 16:07 IST2022-12-05T16:06:47+5:302022-12-05T16:07:10+5:30

गावातील मंदिरात देवदर्शानासाठी गेल्या होत्या. अन् झाल्या होत्या बेपत्ता

Murder of old woman for want of gold, incident at Mhaluge in Kolhapur | सोन्याच्या हव्यासापोटी वृद्ध महिलेचा खून, कोल्हापुरातील म्हांळुगे येथील घटना

सोन्याच्या हव्यासापोटी वृद्ध महिलेचा खून, कोल्हापुरातील म्हांळुगे येथील घटना

चुये : सोन्याच्या हव्यासापोटी म्हांळगे ता. करवीर येथील वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना काल, रविवारी (दि.४) उघडकीस आली. लक्ष्मी एकनाथ पाटील (वय ७५) असे या वृद्ध मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिघांना इस्पुर्ली पोलिसांनी अटक केली आहे.

शंकर दत्तू पाटील (वय ६५ ), बच्चाराम शंकर पाटील (४५ ) वेदान्त बच्चाराम पाटील (२० तिघेही रा. म्हाळुंगे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघेही एकाच कुटुंबातील आहेत. वृद्धेच्या अंगावरील सात तोळे सोन्यासाठी हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

लक्ष्मी एकनाथ पाटील या बारा दिवसांपूर्वी गावातील मंदिरात देवदर्शानासाठी गेल्या होत्या. त्या परत घरी आल्या नसल्यामुळे आई बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांचा मुलगा हिंदृराव पाटील यांनी इस्पूर्ली पोलिसांत दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केला. गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तिघे या महिलेला कारमधून घेवून जात असल्याचे दिसून आले.

सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित तिघांना ताब्यात घेतल्यानंतर लक्ष्मी पाटील यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. म्हांळूगे येथीलच ओजाबा, मुलगा, व नातू या तिघांनी मिळून खून केला. तशी कबूली त्यांनी पोलिसांत दिली.

Web Title: Murder of old woman for want of gold, incident at Mhaluge in Kolhapur