Kolhapur crime: इचलकरंजीच्या तरुणाचा निर्घृण खून, हल्लेखोर पसार; कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 14:26 IST2023-03-29T14:25:53+5:302023-03-29T14:26:16+5:30

वादावादीतून हल्लेखोरांनी केले धारदार शस्त्राने वार

murder of Ichalkaranji youth, The reason is unclear | Kolhapur crime: इचलकरंजीच्या तरुणाचा निर्घृण खून, हल्लेखोर पसार; कारण अस्पष्ट

Kolhapur crime: इचलकरंजीच्या तरुणाचा निर्घृण खून, हल्लेखोर पसार; कारण अस्पष्ट

इचलकरंजी : यड्राव (ता शिरोळ) येथील फाट्यावर एका पानपट्टी चालक तरुणाचा मंगळवारी रात्री धारदार शस्त्राने वार करून निर्घुन खून करण्यात आला. तेजस विजय डांगरे ( वय 22, रा अण्णा रामगोंडा शाळेजवळ इचलकरंजी ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलीस ठाण्यात सुरू होते.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तेजस हा पानपट्टी चालक असून. यड्राव फाट्यावर त्याची पानपट्टी आहे. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पानपट्टी बंद करून तो मित्रांसोबत यात्रेत जेवायला जाण्यासाठी थांबला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी त्याला बाजूला असलेल्या वडा सेंटर जवळ बोलावून घेतले. तेथे त्यांच्यात वादावादी सुरु झाली. त्यातून हल्लेखोर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून निघून गेले. 

त्यावेळी तेथे जमलेल्यानी त्याला तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. आयजीएम रुग्णालय परिसरात मित्र व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. नातेवाईक मोठमोठ्याने आक्रोश करत होते. घटनेनंतर संशयावरून तणाव वाढत असल्याने पोलिसांनी आयजीएम रुग्णालय, लिंबू चौक व शहापूर चौक येथे बंदोबस्त तैनात केला होता.

Web Title: murder of Ichalkaranji youth, The reason is unclear