Kolhapur Crime: पन्हाळ्याजवळ वाघबीळ घाटात महिलेचा खून? संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 17:56 IST2023-01-28T17:50:16+5:302023-01-28T17:56:40+5:30
घटनास्थळी करवीर, पन्हाळा, कोडोली पोलिस दाखल

Kolhapur Crime: पन्हाळ्याजवळ वाघबीळ घाटात महिलेचा खून? संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नितीन भगवान
पन्हाळा : कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर पन्हाळ्याजवळ वाघबीळ घाटात एका महिलेची निर्घृण हत्या झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी करवीर, पन्हाळा, कोडोली पोलिस दाखल झाले आहेत.
पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित खून केल्याचे सांगत आहे. मात्र याठिकाणी मृतदेह आढळून आला नाही. पोलिसांकडून शोध मोहीम सुरु आहे. घटनास्थळी रक्ताचे डाग असलेली चादर आढळून आली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला रक्ताचे डाग आढळले आहेत. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. नेमका खून झाला आहे की नाही याबाबत अद्याप स्पष्टता झाली नाही.
आज, खूनाच्या तीन घटना समोर आल्याने कोल्हापूर हादरुन गेले. करवीर तालुक्यातील दोनवडे येथे कौटुंबिक वादातून पतीने दोरीच्या साहाय्याने गळा आवळून पत्नीचा खून केला. अश्विनी एकनाथ पाटील (वय २८) असे या विवाहितेचे नाव आहे. आज पहाटे हा प्रकार घडला.
दरम्यान, चारच्या सुमारास शहरातील जयंती नाल्यात जलशुद्धीकरण केंद्राजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. अंदाजे 35 वर्षे वयाच्या महिलेचा हा मृतदेह आहे. संबंधित महिलेने आत्महत्या केली, की तिचा घातपात झाला याबाबत अद्याप माहिती स्पष्ट झालेली नाही.