शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

मुरगूड नगरपालिकेस ‘ओडिएफ प्लस’ मानांकन : स्वच्छ सर्वेक्षण अभियानाबाबत कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:15 AM

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये मुरगूड नगरपरिषदेने उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल शासनाकडून पालिकेला ओडिएफ प्लस मानांकन प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यामुळे नगरपालिकेला शासनाकडून स्वच्छता व

ठळक मुद्देचाळीस लाखांचा मिळणार निधी

मुरगूड : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये मुरगूड नगरपरिषदेने उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल शासनाकडून पालिकेला ओडिएफ प्लस मानांकन प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यामुळे नगरपालिकेला शासनाकडून स्वच्छता व विकास कामासाठी सुमारे चाळीस लाखाचा निधी मिळणार आहे. भविष्यात ओडिएफ प्लस प्लस व सेव्हन स्टार मानांकन मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुरगूड शहर हागणदारीमुक्त झाल्याबद्दल शासनाकडून १ कोटीचे बक्षिस यापूर्वीच जाहीर झाले आहे. आता स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत हागणदारीमुक्त संदर्भात विशेष पथकाने दोन महिन्यांपूर्वी शहराची डिजिटल साधनांच्या माध्यमातून पाहणी केली होती. त्याचा अहवाल शासनास सादर केला होता. या सर्वेक्षण अभियानासाठी पालिका सर्व ताकदीनिशी सज्ज होती. त्यामुळेच या हा बहुमान मिळाला आहे.नगरपालिकेने शहरात हायटेक सार्वजनिक शौचालये सुरु केली आहेत. या अंतर्गत पाण्याची व्यवस्था , कमोड, हँडवॉश, आरसे, लाईट, बेसिन आदी व्यवस्था केली आहे. या शौचालयाच्या आजूबाजूला स्वच्छताही ठेवली होती. याची दखल घेवून मुरगूडला हागणदारीमुक्तीबाबत ओडिएफ प्लस दर्जा मिळाला आहे.

या पुढे प्लस प्लस असा दर्जा मिळविण्याचा प्रयत्न पालिकेचा असल्याचे व याकामी प्रा. संजय मंडलिक, मुख्याधिकारी संजय गायकवाड, पदाधिकारी, सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाल्याचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेस उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, पक्ष प्रतोद जयसिंग भोसले, दीपक शिंदे, सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.मुरगूड (ता. कागल) येथे नगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी अशा पद्धतीने हायटेक शौचालये उभा केली आहेत. यामुळेच शासनाने ओडिएफ प्लस दर्जा दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान