शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांचे नगरसेवकपद रद्द

By admin | Updated: May 10, 2016 02:32 IST

जातीचे दाखले अवैध : दीपा मगदूम, सचिन पाटील यांचेही सदस्यत्व रद्द; आयुक्तांची कारवाई

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह तिघा नगरसेवकांचे जातीचे दाखले अवैध ठरविल्यामुळे त्यांना सोमवारी आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले. गेल्या आठ दिवसांत महानगरपालिका सभागृहातील सात नगरसेवकांचे जातीचे दाखले रद्द झाल्यामुळे त्यांना घरचा रस्ता धरावा लागला. त्यामध्ये सर्वाधिक चार नगरसेवक कॉँग्रेसचे असून, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप आणि ताराराणी आघाडीच्या प्रत्येकी एक नगरसेवकाचा त्यामध्ये समावेश आहे. १२ दिवसांपूर्वी याच कारणास्तव अख्तर शेख यांना लातूरच्या महापौरपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.सोमवारी कोल्हापूर विभागीय जात पडताळणी समितीने महापौर अश्विनी रामाणे, दीपा मगदूम (कॉँग्रेस), सचिन पाटील, हसिना फरास (राष्ट्रवादी) व किरण शिराळे (ताराराणी आघाडी) या पाच नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भातील निकाल महानगरपालिका प्रशासनास दिला. त्यानुसार महापौर रामाणे, दीपा मगदूम व सचिन पाटील यांचे कुणबी जातीचे दाखले अवैध ठरविले. निकाल प्राप्त होताच सायंकाळी साडेसात वाजता आयुक्त पी. शिवशंकर यांनी तातडीने त्यांचे नगरसेवकपद रद्द केल्याचे जाहीर केले. गेल्या आठ दिवसांत महिला बाल कल्याण समिती सभापती असलेल्या वृषाली कदम, संदीप नेजदार (कॉँग्रेस), संतोष गायकवाड (भाजप), नीलेश देसाई (ताराराणी आघाडी) या चौघांना जातीचे दाखले अवैध ठरल्यामुळे नगरसेवकपदास मुकावे लागले होते. त्यापाठोपाठ सोमवारी तीनजणांचे जातीचे दाखले अवैध ठरले. त्यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ माजली असून, जातीचे बोगस दाखले घेऊन निवडणुका जिंकणाऱ्यांचे बिंग फुटले. महानगरपालिका प्रशासनाने ज्या भागातील नगरसेवकांवर (पान १० वर)स्थगिती मिळाली तर पद वाचतेअश्विनी रामाणे यांचे नगरसेवकपदच रद्द झाल्यामुळे तसा विचार केल्यास नव्या महापौर निवडीचा प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे; परंतु ‘नगरसेवक पद रद्द’च्या जातपडताळणी कार्यालयाच्या आदेशास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यास रामाणे यांच्या महापौरपदास धोका नाही. न्यायालय काय निर्णय देते यावरच या गोष्टी अवलंबून आहेत. महापालिका कायद्यात ‘काळजीवाहू महापौर’ अशी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे एकतर रामाणे याच महापौर किंवा नवी निवड हे दोनच पर्याय उपलब्ध असल्याचे नगरविकास विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.अलीकडची दुसरी घटनालातूरचे महापौर अख्तर शेख यांचे जात वैधता प्रमाणपत्र विभागीय जात वैधता पडताळणी समितीने रद्द केल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ मात्र न्यायालयाने २८ एप्रिलला ती फेटाळून लावल्याने अख्तर शेख यांनी लागलीच महापौर व नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता.जातपडताळणीमध्ये सत्तारूढ आणि विरोधी दोन्हींकडूनही काही सदस्य कमी झाले आहेत. आम्ही सत्तेची गणिते जुळविण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही ते तितके सोपे नाही. त्यासाठी जातपडताळणीच्या निकालावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीने या सर्व रिक्त जागांवर विजय मिळविला पाहिजे तरच सत्तेची गणिते जुळून येतील. - चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्रीजातीचे दाखले तपासणी मोहिमेच्या कालावधीत जात पडताळणी अधिकाऱ्यांवर चंद्रकांतदादा पाटील यांनी दबाव आणल्याने दोघांच्याही फोन कॉलची तपासणी करावी. - हसन मुश्रीफ, आमदार