शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

कॅरम स्पर्धेत मुंबईचा ओंकार नेटके विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST

कसबा बावडा येथील छत्रपती शंभुराजे फ्रेंडस‌् सर्कलच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कॅरम स्पर्धेमध्ये मुंबईच्या ओंकार नेटके याने ...

कसबा बावडा येथील छत्रपती शंभुराजे फ्रेंडस‌् सर्कलच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कॅरम स्पर्धेमध्ये मुंबईच्या ओंकार नेटके याने विजेतेपद पटकावले. त्याला रोख रुपये २१ हजार व चषक कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला, तर मुंबईच्याच राजेश गोयल याने उपविजेतेपद पटकावले. त्याला ११ हजार रुपये व चषक मिळाला. स्पर्धेत एकूण २५० जणांनी भाग घेतला होता.

२४ ते २६ जानेवारीअखेर पार पडलेल्या या स्पर्धेत स्थानिक कोल्हापूरसह मुंबई, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, इचलकरंजी या ठिकाणच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील इतर विजेते पुढीलप्रमाणे- उत्कृष्ट खेळाडू- श्रुती वेळेकर (पुणे), प्रथम ओपन टू फिनिश- किशोर बोंडवे (पुणे), प्रथम ब्लॅक टू फिनिश- सुनील चव्हाण (कोल्हापूर) यांनी यश मिळवले.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी माजी नगरसेवक मोहन सालपे, श्रीराम सोसायटीचे उपसभापती संतोष ठाणेकर, ॲड. नीलेश नरुटे, विनायक कारंडे, गजानन बेडेकर, श्रावण फडतारे, सुनील जाधव, सचिन पाटील उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजन शिवाजी एकशिंगे, प्रवीण पाटील, बाजीराव माने, सुनील पाटील, प्रशांत माने, गणेश रकटे, युवराज माने, नितीन पाटील, विनायक माने, सुजल माने, महेश माने, ओंकार भोसले आदींनी केले.

फोटो २९ बावडा कॅरम स्पर्धा

कॅप्शन -

छत्रपती शंभुराजे फ्रेंडस‌् सर्कल आयोजित कॅरम स्पर्धेत विजेतेपद पटकाविलेल्या ओंकार नेटके याला चषक प्रदान करताना आमदार ऋतुराज पाटील. यावेळी मोहन सालपे, ॲड. नीलेश नरुटे, सचिन पाटील, विनायक कारंडे आदी उपस्थित होते.