एम.फिल., पीएच.डी.ची प्रवेश परीक्षा ‘आॅफलाईन’!

By Admin | Updated: August 26, 2015 00:48 IST2015-08-26T00:44:45+5:302015-08-26T00:48:55+5:30

विद्यापीठ घेणार परीक्षा : आजपासून आॅनलाईन अर्जांची प्रक्रिया सुरू!

M.Phil., PhD entrance examination 'Offline! | एम.फिल., पीएच.डी.ची प्रवेश परीक्षा ‘आॅफलाईन’!

एम.फिल., पीएच.डी.ची प्रवेश परीक्षा ‘आॅफलाईन’!

कोल्हापूर : परीक्षाविषयक कामकाजाबाबत ‘एमकेसीएल’वरील अवलंबित्व कमी करण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणून शिवाजी विद्यापीठ स्वत:च्या यंत्रणेमार्फत एम. फिल., पीएच.डी.च्या प्रवेश परीक्षा घेणार आहे. यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आज, बुधवारपासून सुरू होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून या परीक्षा आॅनलाईन घेतल्या जात होत्या. मात्र, यावर्षी आॅफलाईन पद्धतीने होणार आहे.विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या एम.फिल., पीएच.डी. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, परीक्षेची तारीख विद्यापीठाने मंगळवारी जाहीर केली. विविध विद्याशाखांसाठी पीएच.डी.च्या ९०० आणि एम.फिल.च्या ५४० जागा आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना आजपासून नऊ सप्टेंबरपर्यंत (ँ३३स्र://ङ्मल्ल’्रल्ली.२ँ्र५ं्न्र४ल्ल्र५ी१२्र३८.्रल्ल) या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करावयाचा आहे. त्यातील प्रत्येक विषयासाठी शंभर गुणांची प्रवेश परीक्षा आॅफलाईन पद्धतीने ओएमआर शीटद्वारे घेतली जाणार आहे. या परीक्षेतूनमुलाखतीसपात्र होण्यासाठी ४० गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. शिवाजी विद्यापीठाची एम.फिल. थेअरी अथवा पदवी प्राप्त असल्यास प्रवेश परीक्षेतून सूट देण्यात येईल. (प्रतिनिधी)


प्रवेश प्रक्रिया व परीक्षा-विषयक कामकाजाबाबतचा ‘एमकेसीएल’वर अवलंबित्व कमी करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून एम. फिल., पीएच.डी.च्या प्रवेश परीक्षा विद्यापीठ आपल्या यंत्रणेमार्फत घेणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
शिवाय प्रथम वर्षाच्या परीक्षादेखील विद्यापीठ स्वत:कडे घेण्याच्या विचारात आहे.
- डॉ. डी. आर. मोरे,
संचालक, बीसीयुडी.

Web Title: M.Phil., PhD entrance examination 'Offline!