शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नव्या अशासकीय मंडळासाठी हालचाली

By admin | Updated: November 10, 2014 00:42 IST

बाजार समिती : भाजप कार्यकर्त्यांचा पणन मंत्र्यांकडे रेटा; आठ दिवसांसाठी प्रशासक नियुक्तीही शक्य

कोल्हापूर : राज्यातील भाजप सरकारचा विश्वासदर्शक ठरावानंतर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर छोटेखानी अशासकीय मंडळ नियुक्त करण्याच्या हालचाली भाजप गोटात सुरू आहेत. तोपर्यंत सोमवारी आठ दिवसांसाठी प्रशासक नियुक्त केला जाण्याची दाट शक्यता आहे. यासाठी मोहन निंबाळकर यांच्यासह जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांची नावे पुढे येत आहेत. अशासकीय मंडळाला पणन संचालकांनी स्थगिती दिल्यानंतर बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. डॉ. महेश कदम यांना हटवून अशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती, त्यामुळे कदम यांचे नाव पुन्हा चर्चेत आले पण कदम यांच्या नावाला काही मंडळींनी विरोध केल्याचे समजते. वरिष्ठ पातळीवरून रत्नागिरी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील उपनिबंधक मोहन निंबाळकर यांचे नाव अनपेक्षितपणे पुढे आले. निंबाळकर यांनी आपण प्रशासक म्हणून काम करण्यास नकार दिल्याचे समजते. जिल्हा विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, शहर उपनिबंधक रंजन लाखे, हातकणंगलेचे उपनिबंधक सुनील सिंगतकर यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे, पण वरिष्ठांकडून यापैकी एका नावाला हिरवा कंदील मिळालेला नाही. समितीच्या निवडणुकीसाठी अजून तीन-चार महिन्यांचा कालावधी असल्याने तोपर्यंत अशासकीय मंडळ नियुक्त करावे, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली आहे. पाच ते सात जणांचे अशासकीय मंडळ करून त्यांच्या माध्यमातून भाजप-शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असा रेटा कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे लावला आहे. या मागणीवरही पणन विभागात गांभीर्याने विचार सुरू आहे. राज्यातील भाजप सरकार विश्वासदर्शक ठराव संमत व्हायचा असल्याने आताच अशासकीय मंडळाची नियुक्ती नको, तोपर्यंत प्रशासकांची नेमणूक करा, असा ही प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर हे आपल्याकडेच पदभार ठेवण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. अशासकीय मंडळ न्यायालयात !पणन संचालकांनी दिलेल्या स्थगितीविरोधात अशासकीय मंडळ उद्या, सोमवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे प्रा. निवास पाटील यांनी सांगितले. बाजार समितीचा चांगला कारभार करणाऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. महेश कदम यांनी आपल्या कारकिर्दीत मनमानी कारभार केल्याने त्यांना आमचा विरोध आहे. - नंदकुमार वळंजू (माजी संचालक, बाजार समिती)